वडूज : उरी (जम्मू काश्मिर) येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्यात सुमारे 20 जवान शहिद झाले. यापैकी एक जवान माण तालुक्यातील जाशी येथील चंद्रकांत गलंडे आहे. या घटनेचे खटाव तालुक्यात तीव्र संतप्त पडसाद उमटले. वडूज शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक, राजकीय संघटनेच्या कार्यकत्यांनी एकत्र येवून जाहीर मोर्चा काढत पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे छत्रपती शिवाजी चौकात दहन केले.
हुतात्मा परशुराम विद्यालय, एस. टी. बस स्थानक, तहसिल कचेरी, मार्गे हा मोर्चा झाला. यावेळी शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय च्या घोषणांनी परीसर दणाणून गेला. तहसिल कार्यालयातून शिवाजी चौकात मोर्चा आल्यानंतर कार्यकत्यांनी शरीफ यांच्या पुतळ्यास जोडे मारत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. बंडा गोडसे, युवा नेते शहाजी गोडसे, भगवे वादळचे अध्यक्ष धनाजी गोडसे, गणेश गोडसे, सुहास गोडसे, विनोद शिंदे, सुनिल गोडसे, शरद गोडसे, निलेश गोडसे, विजय काळे, रविंद्र गोडसे, दिगंबर गोडसे, विक्रम गोडसे, नवीन दिक्षीत, सचिन भोंडवे, आनंदा रायबोळे, आप्पाजी खुडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के व सहकार्यांनी आंदोलन काळात चोख बंदोबस्त ठेवला.