Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीजिल्ह्यात आज चार रुग्ण पॉझिटिव्ह....

जिल्ह्यात आज चार रुग्ण पॉझिटिव्ह….

सातारा दि. 15 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे विलगीकरण कक्षात दाखल असणाऱ्या 10 महिन्याच्या पुरुष जातीचे बाळ व 28 वर्षीय पुरुष आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला तसेच उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 27 वर्षीय महिला अशा 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या एकूण 7 होती. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आला असून हा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. 4 कोरोना संसर्गितांवर मार्गदर्शक नियमानुसार  कोटेकोरपणे निगराणीखाली उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण 8 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.

 

फलटण तालुक्यातिल तरडगाव च्या महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह 

फलटण प्रतिनिधी  – मुंबई व पुण्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना फलटण तालुक्यातिल तरडगाव च्या महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,मात्र त्यांना ट्रॅव्हल हिस्ट्री असल्याने त्यांना नक्की कोरोना पुण्यात झाला का?फलटण मध्ये या बाबतीत अजून माहिती मिळाली नाही, या मुळे फलटण प्रशासनाने घरात राहा सुरक्षित राहा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाची (कोविड19) या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना,तथापि सातारा जिल्ह्यात सात रुग्ण असताना आता ही संख्या नऊ झाली आहे, या मुळे त्या रुग्णाला कोरोन्टाईन या पूर्वी केले होते, त्याचबरोबर पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, मात्र कोरोन्टाईन ची मुदत संपल्याने पुन्हा एकदा तपासणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular