पुसेसावळी व औंध पोलीसांनी केले गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूचे वाटप…

 

पुसेसावळी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुसेसावळी व औंध पोलीसांच्या वतीने पुसेसावळीसह परिसरातील मधील अनेक कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले, तरी पोलीस बांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र बंदोबस्त
करत माणुसकीही जपल्याचेही दर्शन पुसेसावळीसह परिसरातील या निमित्ताने
झाले आहे.

 

पुसेसावळीसह चोराडे, वडगाव (ज.स्वा) करांडेवाडी, येळीव, नागाचे कुमठे, वरुड गोसाव्याची वाडी, या गावातील अनेक कुटुंबाना पंधरा दिवस पुरेल एवढा धान्यसाठा दिला यामध्ये तेल, तांदूळ, गहू, डाळ व अन्य वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे.

तरी पुसेसावळी सह परिसरातील गरजू लोकांना पोलिस ठाण्यामार्फत घरपोच धान्य देण्याची व्यवस्था करुन पुसेसावळी व औंध पोलीस कर्मचाऱ्यांनी एवढ्या व्यस्त वेळातून वेळ काढून सर्व धान्याचे पॅकिंग केले. तरी पंकज भुजबळ व प्रशांत पाटील या पोलीस अधिकार्‍यांनी प्रत्येक गावात जाऊन जीवनावश्यक वस्तु पोहच केल्या.