पुणे- आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत 51 लाख रुपयांचे 1 किलो 63 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. सोने तस्करी करण्यासाठी ट्रॉली बॅगचा हॅन्डलचा वापर करण्यात आला आहे. चाकांमध्ये सोने लपवले होते. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद युसूङ्ग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो दुबई येथून अबुधाबी वरून विमानाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. कस्टम विभागाचे के. सुभेंद्र यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कस्टम विभागाच्या अधिकार्यांकडून तपासणी सुरू असताना युसूङ्गची बॅग स्क्रिन करण्यात आली. यावेळी त्यात सोने लपवल्याचे आढळून आले. हे सोने दोन बॅगच्या आत, हँडल व चाकांमध्ये लपविण्यात आले होते. तसेच ते डियटेयट होऊ नये यासाठी त्यावर रोडियम प्लेटचा कोट देण्यात आला होता. मात्र, स्क्रिनिंग दरम्यान सोने आढळल्याने बॅगची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात तब्बल 51 लाख 35 हजार 602 रुपये किमतीचे 1.63 किलोग्रॅम सोने मिळाले.
पुणे विमानतळावर 51 लाखांचे सोने जप्त
RELATED ARTICLES