सातारा : भारतीय जनता पार्टी च्या खटाव तालुका सरचिटणीस पदी कलेढोण चे सोमनाथ शेटे यांची निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते त्यांना अकलूज येथे देण्यात आले.यावेळी सहकारमंत्री मा.सुभाष देशमुख, माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर, पक्ष निरीक्षक पाटील साहेब, अनिल देसाई,सर्व माढा मतदारसंघातील तालुका प्रमुख यांची उपस्थिती होती.याच वेळी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी कलेढोण येथील माजी.सरपंच संतोष ढोकळे, महेश पाटील,राहुल महाजन, बबनराव शेटे,प्रदीप साळुंखे, सुहास शेटे, महादेव ढोकळे, सुरेश बुधावले,विजय जंगम, सयाजी पाटील,चंद्रकांत घाडगे, गुलाबभाई शिकलगार, नामदेव पिसे, जाफरभाई शेख,शरद दबडे, प्रविण पाटिल,हारुन काझी, श्रिकांत शेटे,सौरभ शेटे,उमेश शेटे सर्व सहकारी यांचे पक्षाच्या वतीने स्वागत केले.
सोमनाथ शेटे व सर्व सहकारी यांचे माजी आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, खटाव तालुका अध्यक्ष विकल्प शाह, सरपंच सचिन गुदगे, सतीश शेटे, उद्योजक शंकरराव काशीद, पंचायत समिती सदस्य मेघना ताई पुकळे, सुरेशशेठ शिंदे, सुरेश पाटील ,बाबासो पाटील,उद्योजक एकनाथ सदावर्ते,हसन शेख,शिवाजी राव साखरे,हणमंतराव पाटील व सर्व भाजपा पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.नूतन भाजपचे खटाव तालुक्याचे सरचिटणीस सोमनाथ शेटे व त्यांचे सहकारी यांचे स्थानिक नागरिकांनी व महिलांनी कलेढोण येथे जोरदारपणे स्वागत करण्यात आले.यावेळी सर्वांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरात एकत्र येऊन ग्रामदैवत च्या साक्षीने पक्ष वाढीचा निर्धार केला. यावेळेस सोमनाथ शेटे यांनी भाजपा पक्षाचे ने दिलेली जबाबदारी योग्यपणे पार पाडून खटाव तालुक्यात पक्षाचे धोरणे सामान्य जनतेपर्यंत पोचविणार असल्याचे सांगितले.
सोमनाथ शेटे यांची भाजपा खटाव तालुका सरचिटणीस पदी निवड
RELATED ARTICLES