Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या विनोद पवारविरुध्द गुन्हा दाखल

तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करणार्‍या विनोद पवारविरुध्द गुन्हा दाखल

महाबळेश्वर : पत्नी व मुलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून आपल्या साडूच्या विराज पवार या तीन वर्षांच्या मुलांचेच अपहरण करणार्‍या विनोद मोतीलाल पवार याच्याविरुद्ध महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आरोपी विनोद पवार याने आपल्या बेळगाव या गावी अपहरण केलेल्या मुलाला नेले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून त्याच्या मागवर पोलिसांनी आपली पथके रवाना केली आहेत आरोपी विनोद लावकरच जेरबंद होईल व विराज ला येत्या चोवीस तासांच्या आत त्याच्या आई वडीलांकडे आम्ही सुखरूप पोहचवू असा दावा पोलिसांनी केला आहे.
महाबळेश्वर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी या घटनेची फिर्याद कांचन जयेश पवार रा मेट गुताड यांनी दिली आहे या प्रकरणातील संशयित आरोपी विनोद पवार याची पत्नी कोमल पवार व अडीच वर्षांची मुलगी समृद्धी या दोघी जणी मागील नऊ दिवसांपासून बेपत्ता आहेत पत्नी कोमल व समृद्धी ला मेहुणी कांचन पवार हिनेच बेपत्ता केल्याचा संशय विनोद याला होता.या संशयावरून त्याने मेहुणीच्या मुलाचेच अपहरण करण्याचा डाव आखला.
विनोद पवार याने मेहुणीचा मुलगा विराज याला खाऊ आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर घेऊन गेला व त्याला बाजारपेठेतून विराजला घेऊन पलायन केले त्यानंतर विनोदने मेहुणीच्या घरी फोन करून बायको व मुलीला दिले नाही. तर मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली.याबाबतची तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल होताच महाबळेश्वर पोलिसांनी आपली चक्रे फिरविली असता अपहरण केलेल्या मुलाला आरोपी विनोद पवार याने आपल्या गावी बेळगाव येथे नेले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असून त्याच्यामागवर पोलिसांनी आपली पथके रवाना केली आहेत याबाबतचा तपास पो नी निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी एच पावरा, चंद्रकांत तिटकारे व भुजंग काळे करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular