सातारा : अविज पब्लीकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा प्रा ़लि ़, पुणे यांचेवतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस बँको ब्ल्यु रिबन 2018 हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मुंबई येथे मान्यवरांचे उपस्थितीमध्ये प्रदान करणेत आला़
अविज पब्लीकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इनमा प्रा ़लि ़, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने तज्ञ समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार सातारा जिल्हा बँकेस या पुरस्काराने सन्मानित केले ़ सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण उत्कृष्ठ कामकाज, संपादन केलेले उज्वल यश आणि भारतामधील बँकिंग सेवेमध्ये विकास व उन्नती करणेचेदृष्टीने असलेले कामकाज व योगदान या बाबींमुळे तसेच रुपये 6000 कोटीवरील ठेवी असलेल्या देशातील जिल्हा बँक श्रेणीमधून सातारा जिल्हा बँकेची प्रथम क्रमांकाचे पुरस्कारासाठी निवड झाली.
सदर पुरस्कार अविज पब्लीकेशनचे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे गुंडाळे, गॅलेक्सी इन्माचे संचालक अशोक नाईक यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये कोटक महिंद्रा बँकेचे श्री ़टी ़व्ही ़ सुधाकर यांचे हस्ते बँकेचे अधिकारी सुरेंद्र शिंदे यांनी स्विकारला टी ़व्ही ़सुधाकर यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श असणारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विशेष उल्लेख केला ़
या संस्थेने सातारा जिल्हा बँकेस सन 2013, 2014, 2015, 2016 व 2017 मध्येही विविध पुरस्कारांनी गौरविणेत आले आहे.आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. या पुरस्कारांमुळे बँकेच्या लौकीकामध्ये आणखी भर पडली आहे़
जिल्हयातील सर्वसामान्यांचे आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ट निधी नियोजन, शून्य टक्के निव्वळ एन ़पी ़ए ़, दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगव्दारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आयएसओ 9001-2008 मिळालेले मानांकन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये झालेली नोंद तसेच सामाजिक बांधिलकी कायमच जपत असलेने बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमठविलेला आहे.
यावेळी महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून आलेले विविध जिल्हा मध्य ़ बँकांचे, नागरी सहकारी बँकांचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल विधान परिषद सभापती व बँकेचे संचालक ऩा ़श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, अध्यक्ष ़श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेसह सर्व संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ऱाजेंद्र सरकाळे, सर्व अधिकारी व सेवक वर्ग, गटसचिव यांनी अभिनंदन करून बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या पुरस्कारामुळे बँकेचे ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार व सभासद संस्थांनी बँकेच्या गुणवत्तापुर्वक यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले ़
बँको ब्ल्यु रिबन 2018 प्रथम क्रमांकाचे पुरस्काराने जिल्हा बँक सन्मानित
RELATED ARTICLES