Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसफाई कर्मचार्‍यांच्या वारसांचे पालिकेत धरणे आंदोलन

सफाई कर्मचार्‍यांच्या वारसांचे पालिकेत धरणे आंदोलन

26 जानेवारीला आत्मदहनाचा इशारा
सातारा : सातारा नगरपालिकेतील सफाई कर्मचार्‍यांच्या वारसांनी आपल्या विविध मागण्यासाठी आज मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन केले. दरम्यान दिनांक 23 जानेवारीपर्यंत हे धरणे आंदोलन सुरू राहणार असून या तीन दिवसात आम्हाला ऑर्डर न दिल्यास 26 जानेवारी रोजी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
आंदोलकांनी शंकर गोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा नगर पालिकेतील सफाई कर्मचारी या पदावरून गेल्या दोन वर्ष पासून आमचे पालक सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार 90 दिवसांच्या आत सफाई कामगारांच्या रिक्त जागा भरणे गरजेचे असताना त्या भरल्या गेल्या नाहीत. त्याबाबत आम्ही वारंवार तोंडी चर्चा करून उपोषण, आंदोलने करूनही आम्ही 10 वारसांच्या तोंडाला फक्त पान पुसायचे काम सुरू आहे. 20 ते 25 वर्षांपूर्वी ज्या कर्मचार्‍यांना शासनाने अनेकवेळा डावलले असताना व त्यांच्या जागा लप्स
झाल्या असताना प्रथम त्यांना प्राधान्य देण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे आम्हा 10 कर्मचार्‍यांवर अन्याय होणार आहे. नियमानुसार आम्ही प्रथम पात्र असताना आमच्यावर अन्याय केला जात असल्याने आम्ही आज दि. 21 जानेवारी 23 जानेवारी 2019 असे तीन दिवस आपल्या दालनाबाहेर धरणे आंदोलन करणार आहोत. त्या तीन दिवसात आम्हाला ऑर्डर न दिल्यास दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी सातारा नगरपालिकेसमोर आम्ही 10 जण आत्मदहन करणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी पालिका प्रशासनावर राहणार आहे.
या धरणे आंदोलनात कल्पना रणदिवे, गोविंद साळवे, रवींद्र खंडझोडे, तेजस कांबळे, विशाल कांबळे, नितीन वायदंडे, सुशांत कांबळे, नागेश आवळे, कविता सकटे सहभागी झाले होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular