Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकोरेगांवात गुरुवारी सर्वपक्षीय शोकसभा

कोरेगांवात गुरुवारी सर्वपक्षीय शोकसभा

कोरेगांव: सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्माचार्य, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी कोरेगांव तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांच्या वतीने गुरुवार दि. 24 जानेवारी 2019 रोजी दुपारी 1 वाजता जुना मोटार स्टँड वरील दिलीप मल्टिपर्पज हॉल मध्ये सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे गेल्या गुरुवारी दु:खद निधन झाले आहे. बोपेगांवचे सरपंच, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, किसनवीर कारखान्याचे चेअरमन या पदांबरोबरच सातारा जिल्हा लोकसभेचे खासदार म्हणून लक्ष्मणराव पाटील यांनी केलेल्या कामाची जनमानसात वेगळी छाप होती. सर्वसामान्य जनतेला आपलंस करण्याची हातोटी त्यांच्याकडे होती, ते जरी सातारा जिल्ह्याच्या राजकारणाशी निगडीत असले तरी त्यांची कोरेगांव तालुक्यावर विशेष मेहरनजर होती. या तालुक्यातील प्रत्येक गावात त्यांच्या विचारांचा कार्यकर्ता होता, प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांशी त्यांचे आपुलकीचे नाते होते, यानात्यानेच त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय जनतेच्या वतीने विशेष शोकसभेचे आयोजन केले असून जास्तीत जास्त संख्येने या शोकसभेला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular