पाटण : स्वच्छता अभियान योजनेंतर्गत पाटण नगरपंचायतीने शहरातील प्रभाग नं10 आणि प्रभाग नंबर 11 मध्ये सुरू केलेले वृक्षारोपण कार्यक्रम. बोगस असल्याचे समोर आले आहे. झाडे लावण्यासाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण ऐवजी झाडाच्या फांद्या लावून बोगस वृक्षारोपण करण्याचा पाटण नगरपंचायतीने प्रयत्न केला आहे. हे वृक्षारोपण तातपुरते करुन याचे फोटो काडून ते स्वच्छता अभियान साठी पाठवण्यात येणार होते. हि बाब नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर त्या ठीकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आसता ते वृक्षारोपण नसुन तातपुरते झाडाच्या फांद्या उभ्या करण्याचा प्रयत्न केला होता. हि बाब पाटण नगरपंचायतीच्या निदंनीय असून शासन व नागरीकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार पाटण नगरपंचायतीने केला आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
पाटण नगरपंचायत तर्फे सुरू असलेल्या स्वच्छ भारत- स्वच्छ पाटण 2019 या स्वच्छता अभियान योजनेचा बोजवारा उडाला आहे. नगरपंचायत तर्फे सकाळी पासून घंटा गाडी वर स्पिकर लावून पुकारत असलेल्या स्वच्छता अभियान योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे आणि नागरिक या योजनेत सहभागी होवून नगरपंचायतीला सहकार्य करीत आहेत. पण नगरपंचायत नगरसेवक प्रशासन अधिकारी व कर्मचारी हे सर्वजण या स्वच्छता अभियान योजनेचा कसा बोजवारा उडाला पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहेत. याचे धळधळीत उदाहरण म्हणजे पाटण शहरात सध्या सुरू केलेले स्वच्छता अभियान.
स्वच्छता अभियान योजनेंतर्गत पाटण नगरपंचायतीने शहरातील प्रभाग नं10 आणि प्रभाग नंबर 11 मध्ये सुरू केलेले वृक्षारोपण कार्यक्रम. बोगस असल्याचे समोर आले आहे. झाडे लावण्यासाठी खणण्यात आलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण ऐवजी झाडाच्या फांद्या लावून बोगस वृक्षारोपण करण्याचा पाटण नगरपंचायतीने प्रयत्न केला आहे. हे वृक्षारोपण तातपुरते करुन याचे फोटो काडून ते स्वच्छता अभियान साठी पाठवण्यात येणार होते. हि बाब नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर मी त्या ठीकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आसता ते वृक्षारोपण नसुन तातपुरते झाडाच्या फांद्या उभ्या करण्याचा प्रयत्न केला होता. हि बाब पाटण नगरपंचायतीच्या निदंनीय असून शासन व नागरीकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार पाटण नगरपंचायतीने केला आहे.
म्हणजे या स्वच्छता अभियान योजनेचा खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या खड्यात खोवण्यात आलेले रोपटे हे निव्वळ निरगुडी, आंबा व ईतर, प्रकारच्या वनस्पतींच्या रोप नसून फक्त तोडलेल्या फांद्या लावल्या आहेत. या परिसरातील जागरूक नागरिकांनी या प्रकाराची माहिती पाटण मधील सामाजिक कार्यकर्ते नितिन पिसाळ यांना दिली. नंतर सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ यांनी स्वतः जागेवर जाऊन पहाणी केली असता त्यात सत्यता आढळून आली त्यामुळे नितीन पिसाळ यांनी त्यां खोदलेल्या फांद्या खड्यामधून काढून टाकले. यावरून पाटण नगरपंचायत नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी हे सर्वजण निव्वळ शासकीय अनुदान लाटण्यासाठी स्वच्छता अभियान योजनेचा फसवे आयोजन करत असून शासन व शहरातील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. शासनाने सुद्धा स्वच्छता अभियानाच्या या प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून लक्ष देवून दोषी व्यक्तीवर कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली आहे
पाटण नगर पंचायतीचा शासन व नागरीकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचा प्रकार – सामाजिक कार्यकर्ते नितीन पिसाळ
RELATED ARTICLES