Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीकरपेवाडी येथील विद्यार्थीनीच्या खूनाच्या निषेधार्थ पाटण येथे विद्यार्थी -: विद्यार्थीनी कडून मुकमोर्चा.

करपेवाडी येथील विद्यार्थीनीच्या खूनाच्या निषेधार्थ पाटण येथे विद्यार्थी -: विद्यार्थीनी कडून मुकमोर्चा.

 

पाटण:-
ढेबेवाडी विभागातील करपेवाडी ता. पाटण जि. सातारा येथील बारावीतील विद्यार्थिनीचा घरापासुन काॅलेजच्या निम्या वाटेत गळा चिरून खून झाल्याची घटना दि.२२ रोजी मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने पाटण तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या घटनेच्या निषेधार्थ व अजुनही मोकाट असलेल्या आरोपीना तात्काळ अटक होणेसाठी पाटण शहरातील विद्यार्थी-विद्यार्थीनी यांनी उत्स्फुर्त रस्त्यावर उतरुन पाटण तहसिल कार्यालयावर मुक मोर्चा काढला. व तहसिल कार्यालयाजवळ या करपेवाडी येथिल घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करुन भाग्यश्रीच्या मारेकरांचा शोध पोलिसांनी तात्काळ घ्यावा व त्यांच्यावर कढक कारवाई करुन या मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी. अशी मागनी या विद्यार्थांनी तहसिलदारांच्याकडे निवेदन देऊन केली.

भाग्यश्री संतोष माने वय- १७ रा. करपेवाडी हि १२ वीतील विद्यार्थीनी तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयात शिकत होती. ती नेहमीप्रमाणे सकाळी काॅलेजला जाते, असे सांगून घरातून गेली. मात्र, काॅलेज सुटल्यानंतर नेहमीच्या वेळेत ती घरी परतली नाही. त्यानंतर घरच्यांनी व नातेवाईकांनी तिची सगळीकडे चौकशी करण्यास सुरूवात केली. तिच्या मैत्रीणी, महाविद्यालय, संबधित आप्तेष्ट यांच्याकडे त्यांनी चौकशी केली आसता भाग्यश्रीचा शोध लागला नाही. ती ज्या मार्गाने जाते ती शेतातील पायवाट आहे. ती करपेवाडीतून थेट तळमावलेत येते. त्या मार्गावर भाग्यश्रीची आई व आजीने शोधाशोध सुरू केली असता. करपेवाडी नजीकच्या शेतातील रस्त्यात तिचा मृतदेह गळा चिरलेल्या आवस्थेत आढळुन आला.

कुटुंबियांनी या घटनेची त्वरीत माहिती ग्रामस्थ व पोलिसांना दिली. मात्र, तिच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी हा भाग्यश्रीवर घातपात असल्याचे बोलले जात आहे. भाग्यश्रीवर झालेल्या या निघ्रुन घातपाताचा सर्व स्थरातुन निषेध व्यक्त करण्यात येत असताना. पाटण शहरातील शाळा, काँलेज, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी उत्स्फुर्त रस्त्यावर उतरुण नविन एस.टी.स्टँड ते तहसिल कार्यालयापर्यंत मुक मोर्चा काढला. भाग्यश्रीच्या मारेकरांचा शोध पोलिसांनी त्वरीत लावावा. व त्यांना फाशीच द्यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थांनी केली. यावेळी विद्यार्थी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, बहुजन सर्व समाज बांधव विद्यार्थी-विद्यिर्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular