Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीजवान हवालदार निवास हणमंतराव गायकवाड यांचेे अपघाती निधन

जवान हवालदार निवास हणमंतराव गायकवाड यांचेे अपघाती निधन

रहिमतपूर : वाठार (किरोली) ता. कोरेगांव येथील जवान हवालदार निवास हणमंतराव गायकवाड (वय 38) यांचे दिल्ली येथे देशसेवेमध्ये कार्यरत असताना अपघाती निधन झाले. हवालदार निवास गायकवाड सध्या आर्मि मेडिकल कोर या खात्यामध्ये देशसेवा बजावत होते. त्यांचे वडील कै. हणमंतराव खाशाबा गायकवाड हे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाचे धडकल्यानंतर वाठार (किरोली) सह अवघा पंचक्रोशी परिसर शोकसागरात बुडाला होता. हवालदार निवास गायकवाड यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा सार्‍यांनाच लागून राहिलेली आहे. आज सकाळपासून वाठार मध्ये मान्यवरांची रीघ लागली होती.
निवास यांच्या कुटुंबासह नातेवाईंकांचा अश्रूंचा बांध फुटला होता. हवालदार निवास यांच्या वीरपत्नी स्मिता, मुलगा आर्यन, रोहित आणि कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. हवालादार निवास यांना आई व दोन बंधू पण आहेत. थोरले बंधू प्रकाश देशसेवेतून रिटायर झाले आहेत आणि एक विकास हे शेतीमध्ये आहेत. हवालदार निवास गायकवाड 1 एप्रिल रोजी देशसेवेतून सेवानिवृत्त होणार होते आणि 8 फेब्रुवारी रोजी त्यांना एक महिना सुट्टीवर येणार होते. त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. वाठार मध्ये हवालदार निवास गायकवाड यांच्या पार्थिवाची कुटूंबीय आणि ग्रामस्थ वाट पहात आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular