के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न
सातारा : या शाळेतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासच होतो असे नव्हे तर त्यांचा सर्वांगिण विकास होवून भविष्यात ते यशस्वीही होतात व ही शाळा खरोखरच आदर्श आहे असे उद्गार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भास्कर गायकवाड यांनी काढले. सातारा येथील के. एस. डी. शानभाग के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळ्यात डॉ. गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले.
शाळेच्या तीन दिवस संपन्न झालेल्या या सोहळ्यासाठी दुसर्या दिवशी मेढा येथील मेरुलिंग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी शाळेचे संस्थापक रमेश शानभाग, सौ. उषा शानभाग, शाळेचे संचालक अॅड. विलास आंबेकर, सौ. अमिता आंबेकर, संचालिका सौ. आचल घोरपडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. रेखाा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नटराज मुर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पूर्व प्राथमिक तसेच इयत्ता 1 ली ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्याविष्कार सादर केले.
शाळेचे माजी विद्यार्थी असलेले शास्त्रज्ञ डॉ. भास्कर गायकवाड हे सध्या आय. सी. ए. आर. नॅशनल इन्स्टीट्यूटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, या शाळेतील विद्यार्थी खरोखरच भाग्यवान आहेत. कारण मी व माझे दोन्ही बंधू याच शाळेत शिकून मोठे झालो. मी स्वत: शास्त्रज्ञ, दुसरा भाउ मिल्ट्रीमध्ये मेजर तर तिसरा भाउ इंडीयन नेव्हीमध्ये मार्शल आहे.
प्रमुख पाहुणे सुधीर पवार यांनी या शाळेसाठी शानभाग कुटुंबियांनी साडेनउ एकराचा परिसर देवून दिलेले योगदान व दातृत्वाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मी माझ्या कारकीर्दीत एकमेव अशी ही शाळा पाहतो आहे की, जिथे विविध उपक्रम राबवून या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देवून प्रोत्साहीत केले जाते. या शाळेने आजवर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर खेळाडू घडविले व या विद्यार्थ्यांनी समाजात नाव लौकिक मिळवला हे कौतुकास्पद आहे.
शाळेची सर्वोत्कृष्ठ विद्यार्थीनी म्हणून चैतन्या राजे इ. 10 वी हीचा तर पूर्व प्राथमिक मधील सर्वोत्कृष्ठ विद्यार्थीनी म्हणून के. जी. तील तनिष्का काळे यांच्यासह शाळेच्या इ. 10 वी तसेच 1 ली ते 9 वी आणि पूर्व प्राथमिक विभागातील गुणवंताचा गौरव पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी स्काउट गाईडमधील सर्वोत्कृष्ठ आणि 54 राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध खेळात प्राविण्य मिळवणार्या खेळाडू व प्रशिक्षकांना गौरवण्यात आले.
समारंभात मुला मुलिंनी पारंपारीक लोकनृत्ये, देशभक्तीपर समुह नृत्ये, प्लॅस्टीकचा वापर टाळा हा संदेश देणारा आगळे वेगळे नृत्यही सादर केले. तसेच लेक वाचवा या विषयावरील अनोखे नृत्य सर्वांचे आकर्षण ठरले. खेळाचे महत्व व देशाने क्रिडा क्षेत्रात सादर केलेल्या प्रगतीचे दर्शन घडवणारी नृत्येही विशेष ठरली. हे स्नेहसंमेलन केवळ मनोरंजनासाठी नसून त्याचा उपयोग सामाजिक समस्यांवर भाष्य करणे, जनजागृती करणे हाच संदेश या सादरीकरणातून मुला मुलींनी दिला. कार्यक्रमाची सांगता भारतीय सैनीकांच्या जिवनावर आधारीत मुख नाट्याने होताना सर्वांचीच मने या सादरीकरणाने जिंकली.
मराठी हिंदी व संस्कृत भाषेतील नाटीकामधून विद्यार्थ्यांनी आपले अभिनय कौशल्य सादर केले. तिनही दिवसांच्या सुत्र संचालनाची जबाबदारी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अतीशय सहजपणे व उत्कृष्ठ रितीने पार पाडली. अशा या उत्साहपूर्ण संमेलनाची सांगता स्नेहभोजनाच्या मनमुराद आस्वादाने झाली. प्रेक्षकांचा उदंड प्रतीसाद व मान्यवरांच्या अमुल्य मार्गदर्शन व कौतुकामुळे हे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले.
शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगिण विकास घडवणारी शाळा आदर्श : शास्त्रज्ञ डॉ. भास्कर गायकवाड
RELATED ARTICLES