महाबळेश्वरः शृंगेरी पीठाचे 37 वे मठाधिपती आध्यशंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती यांचा महाबळेश्वर भेटी चा कार्यक्रम निश्चित झाला आहे . गुरुवार दि.7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्याचे श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे आगमन होणार असून 7 फेब्रुवारी रोजी त्याचे महाबळेश्वर येथील आराम लॉजिंग आणि बोर्डिंग येथे मुक्काम असून दुसर्या दिवशी दुपारच्या सुमारास ते आपल्या पुढील दौर्यास मार्गक्रमण करणार आहेत .
परमपूज्य गुरुस्वामीजींच्या आदेशानुसार जगद्गुरू आध्यशंकराचार्य श्री श्री विधुशेखर भारती यांची सध्या भारत भ्रमण विजय यात्रा सुरु असून या अंतर्गत त्यांचा महाराष्ट्र प्रांताचा भ्रमण दौरा सुरु आहे .या अंतर्गतच त्यांचे गुरुवार दि.7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास फलटण येथून श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे आगमन होणार आहे.श्री क्षेत्र महाबळेश्वर येथिल पंचगंगा मंदिरात सर्व प्रथम ते पंचगंगेच्या तीर्थात स्नान ,नैमेतिक कर्म,तीर्थाचे पूजन – दर्शन करणार आहेत त्यानंतर ते महाबलेश्वराच्या शिव मंदिरात जाणार असून तेथेहि शंभू महादेवाचे पूजन – दर्शन सोहळा होणार आहे .याच वेळी श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानचे विश्वस्थ तसेच पंच ,पुजारी ,भक्तगण यांचा शृंगेरी मठाच्या वतीने मान सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर जगद्गुरू आदयशंकराचार्य श्री श्री विधुशेखरा भारती यांचे महाबळेश्वर येथील प्रसिद्ध आराम लॉजिंग आणि बोर्डिंग (नंदादीप बंगला ) येथे आगमन होणार असून तेथेच त्यादिवशीचा त्यांचा मुक्काम असणार आहे.याच दिवशी रात्री8.30 च्या सुमारास जगद्गुरू च्या हस्ते चंद्रमौलीश्वर पूजन सोहळा होणार आहे तसेच भाविकांना दर्शनाचा हि लाभ होणार आहे . दुसरे दिवशी शुक्रवारी 8 फेब्रुवारी रोजी सकाळी आध्य शंकराचार्य जगदगुरू श्री श्री विधुशेखरा भारती यांचे दर्शन व आशीर्वादपर अनुग्रह मार्गदर्शन होणार आहे. याच दिवशी गणेश जन्म सोहळा असल्याने जगदगुरू च्या हस्ते श्री रानडे यांच्या गणेश मंदिरात श्री गजाननाचे पूजन – दर्शन,गणेश याग सोहळा संपन्न होणार आहे.तसेच त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे आपल्या पुढच्या महाराष्ट्र भ्रमणासाठी कोकणामध्ये डेरवणकडे प्रस्थान होणार आहे. तरी महाबळेश्वर व परिसरातील गुरुभक्त भाविकांनी जगद्गुरू आध्यशंकराचार्य श्री श्री विदुशेखरा भारती यांच्या दर्शनाचा व आशीर्वादपर अनुग्रह मार्गदर्शन चा लाभ घ्यावा असे आवाहन महाबळेश्वर येथील श्रीमंत जगद्गुरू विजययात्रा स्वागत समितीच्या वतीने करण्यात आले आहे .दरम्यान सध्या जगद्गुरू आदयशंकराचार्य श्री श्री विधुशेखरा भारती यांच्या स्वागताची जय्यत तयारी येथे सुरु असून कार्यक्रमाचे नियोजन व तयारी या बाबत मार्गदर्शन करण्यासाठी या विजययात्रा सोहळ्याचे महाराष्ट्र प्रांताचे निमंत्रक वेदमूर्ती श्री विवेक शास्त्री लक्ष्मण गोडबोले यांनी नुकतीच महाबळेश्वर येथील आराम लॉजिंग आणि बोर्डिंग (नंदादीप बंगला ) परिसराची पाहणी करून स्वागत समितीच्या गुरु भक्तांना मार्गदर्शन केले .
मठाधिपती आद्यशंकराचार्य श्री श्री विधुशेखराभारती यांची महाबळेश्वरला भेट
RELATED ARTICLES