साताराः येथील ज्येष्ठ करसल्लागार व माजी सहाय्यक विक्रीकर आयुक्त अॅड.विनायकराव आगाशे यंाची येत्या 6 व 7 फेबु्रवारी रोजी पुणे जिल्हयातील इंदापूर व बारामती येथे सुवर्ण व्यवसाय आणि जीएसटी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
इंदापूर तालुक्यात सराफ असोसिएशनच्यावतीने इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात बुधवार दि. 6 फेब्रुवारी रोजी सायं. 6.30 वा. हे व्याख्यान संपन्न होणार आहे. सराफ व सुवर्णकारांच्या या मार्गदर्शन मेळाव्यात यावेळी अमरपाल सिंग व सेबीचे प्रतिनिधी हेमंत जांभळीकर यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच गुरूवार दि. 7 रोजी बारामती येथील हॉटेल सीटी इन कॉन्फरन्स हॉल येथे बारामतीतील सराफ व सुवर्णकारांच्या मार्गदर्शन मेळाव्यात अॅड. आगाशे यांचे सुवर्णव्यवसाय व जीएसटी या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे.
या दोन्ही मार्गदर्शन मेळाव्यास परिसरातील सराफ व सुवर्णकारांनी उपस्थित राहून तज्ञांचे मार्गदर्शन घेवून आपल्या शंका व अडचणींचे निरसन करावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
अॅड.विनायकराव आगाशे यांची बारामती व इंदापूर येथे मार्गदर्शनपर व्याख्याने
RELATED ARTICLES