Thursday, June 19, 2025
Homeक्रीडासातारचा खेळाडू यश मर्ढेकर याचा मुंबई व सातारा येथे भव्य सत्कार

सातारचा खेळाडू यश मर्ढेकर याचा मुंबई व सातारा येथे भव्य सत्कार

साताराः येथील फुटबॉल खेळाडू यश सतिश मर्ढेकर याने खेलो इंडिया फुटबॉल स्पर्धेत 17 वर्षाखालील वयोगटात विशेष कामगिरी केल्याबद्दल त्याचा मुंबई येथे सचिवालय जिमखाना मंत्रालय तसेच सातारा जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सातारा येथील शामसुंदरी रिलीजिएसन अ‍ॅन्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या के.एस.डी.शानभाग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा हा गुणवंत खेळाडू पुणे येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आपल्या खेळाने चमकला. इ. 11वी कॉमर्स मध्ये शिकणार्‍या यश सतिश मर्ढेकर ने 10 वीत असताना राष्ट्रीय स्तरावर संपन्न झालेल्या फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळ केला होता. नुकत्याच खेलो इंडिया स्पर्धेत उत्तुंग यश मिळवत भरीव कामगिरी करणार्‍या यश मर्ढेकर व त्याच्या संघातील सर्व सहकार्‍यांना राज्याचे शिक्षण व क्रिडामंत्री विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेलो इंडिया गौरविण्यात आले होते. तसेच मुंबई येथे सचिवालय जिमखाना मंत्रालयाच्यावतीने या सर्वाचा सत्कार करण्यात आला.
सातारा येथे प्रजासत्ताक दिनी शाहु क्रिडा संकुलात पालकमंत्री विजय शिवतारे यांचे हस्ते यश मर्ढेकरचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जि.प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे उपस्थित होते .इ.10 वी पर्यंत शानभाग विद्यालयात शिक्षण घेतलेला यश हा सध्या केएसडी शानभाग कनिष्ठ महाविद्यालयात 11 वी कॉमर्समध्ये शिकत आहे.
त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल व झालेल्या सत्काराबद्दल शाळेचे संस्थापक व ज्येष्ठ क्रिडा मार्गदर्शक रमेश शानभाग, संचालिका सौ.उषा शानभाग, सौ.आंचल घोरपडे, शाळेचे मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, पालक संघाचे प्रतिनिधी तसेच शाळेच्या व महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षिका यांनी अभिनंदन केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular