Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीकै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट बँक पुरस्काराने डीसीसी बँक सन्मानीत

कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट बँक पुरस्काराने डीसीसी बँक सन्मानीत

सातारा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि. मुंबई यांचेवतीने दिला जाणारा कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्कार सन 2017-18 सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस मुंबई येथे मान्यवरांचे उपस्थितीत प्रदान करणेत आला.
सदर पुरस्कार महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांचेहस्ते बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, संचालक दत्तात्रय ढमाळ यांनी स्वीकारला. महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या कार्याध्यक्षा श्रीमती सुप्रिया पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, व्यवस्थापक सुजित शेख, यांचे उपस्थितीमध्ये स्वीकारला.
यावेळी जयंत पाटील यांनी सातारा जिल्हा बँकेच्या यशस्वी वाटचालीची, उत्तम व्यवस्थापन व नियोजनात्मक कामकाजाची प्रशंसा केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचारांची जोपासना करणारी हि बँक असून, सातारा जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामांन्यांच्या आर्थिक विकासाकरिता काम करणारी बँक म्हणून सर्वदूर नावलौकिक झालेला असलेचे त्यांनी नमूद केले.
या पुरस्कारामुळे बँकेच्या नावलौकीकामध्ये आणखी भर पडलेली आहे. जिल्ह्यातील सर्वसामांन्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवीत असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, बँक स्थापनेपासून ऑडीट वर्ग अफ , निव्वळ एन.पी.ए. 0% , उत्कृष्ट निधी नियोजन, दर्जात्मक कामकाज, आदर्शवत उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ठ कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबर देशातही झाली आहे. व आधुनिक बँकिंगद्वारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आय.एस.ओ. 9001:2008 मिळालेले मानांकन, लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झालेली नोंद, तसेच सामाजिक बांधिलकी कायमच जपत असलेने बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटविलेला आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या सातत्यपूर्ण व गुणात्मक कामकाजामुळेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबई यांनी सन 1997-1998 पासून बँकेस 14 वेळा संपूर्ण राज्यातून उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकफ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
यावेळी महाराष्ट्रातून विविध जिल्हा मध्यवर्ती बँकांचे व राज्य सहकारी बँकेचे व अर्बन बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, व अधिकारी, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोंसले , संचालक व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर , बँकेचे सर्व संचालक मंडळ, सरव्यवस्थापक एम. व्ही. जाधव, अधिकारी व सेवक वर्गाचे बँकेचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार,हितचिंतक,गट सचिव व मान्यवरांनी अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular