फलटण: कमिन्स इंडिया लि. सुरवडी, ता. फलटण या कंपनीमध्ये फलटण तालुक्यातील स्थानिक व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना नोकरीमध्ये मुद्दाम डावलले जात आहे. दि 17 फेब्रुवारीपर्यंत फलटण तालुक्यातील स्थानिक मुलांना व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना कायमस्वरुपी नोकरी तसेच कॉन्ट्रॅक्ट देण्यात यावीत, अन्यथा 18 फेब्रुवारीपासून कमिन्स कंपनीसमोर ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करणार असल्याचा इशारा दिगंबर आगवणे यांनी दिला आहे.
कमिन्स इंडिया लि. सुरवडी, ता. फलटण या कंपनीसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाने सुरवडी, नांदल व ढवळेवाडी या गावांतील लोकांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्यामुळे अनेक शेतकरी अल्पभूधारक शेतकर्यांच्या परिवारात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे.
संबंधित लोक प्रकल्पग्रस्त असूनसुद्धा कमिन्सने अद्याप या लोकांच्या नोकरीसाठी साधा विचारही केलेला नाही. प्रकल्पबाधित मुलांच्या नोकरीसाठी अनेकदा कमिन्सच्या वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा केली होती.
परंतू कंपनीने याची कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. स्थानिक व प्रकल्पग्रस्त मुलांना कंपनीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात कामावर घेतले जाते. परंतू काही दिवसांनंतर विनासबब त्यांना कामावरुन कमी केले जाते. त्यामुळे सर्वसामान्य प्रकल्पग्रस्त व स्थानिक पात्र मुलांना कायमस्वरुपी रोजगारापासून डावलले जाते.
दि. 17 फेब्रुवारीपर्यंत फलटण तालुक्यातील स्थानिक तसेच प्रकल्पग्रस्त मुलांना कमिन्समध्ये नोकरी तसेच कॉन्ट्रॅक्ट देण्यात यावे, अन्यथा 18 फेब्रुवारी रोजी कमिन्स कंपनीसमोर रास्ता रोको करुन ठिय्या आंदोलन केले जाईल. होणार्या परिणामास सर्वस्वी कंपनी जबाबदार राहील, असा इशारा दिगंबर आगवणे यांनी फलटण तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात दिलेला आहे.
‘कमिन्स’ कंपनीमध्ये स्थानिकांना डावलले गेल्यास रास्ता रोको : दिगंबर आगावने यांचा इशारा
RELATED ARTICLES