कराड : सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र येडेमच्छिंद्र व यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या संयुक्त विद्यमाने माता-बालक व ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 272 जणांची आरोग्य तपासणी व त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात आले. कारखान्याचे संचालक जितेंद्र पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना संचालक जितेंद्र पाटील म्हणाले, साखर कारखानदारीत ऊसतोडणी मजूरांच्या कष्टाचे मोठे योगदान आहे. शेकडो किलोमीटर अंतरावरून हे तोडणी मजूर आपल्या भागात उसतोडणीसाठी येतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. ऊसतोडणी मजूरांना चांगली आरोग्यसेवा देण्याच्या भूमिकेतून अशी आरोग्य शिबीरे नियमीतपणे राबविण्यात यावीत असे आवाहनही संचालक जितेंद्र पाटील यांनी केले. शिबीराची सुरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. संचालक पांडूरंग होनमाने, सेक्रेटरी मुकेश पवार, लेबर वेल्फेअर ऑफिसर अरूण पाटील, श्रीपती हिवरे यांची प्रमुख उपस्थीती होती. शिबीरास डॉ.प्रकाश वाठारकर, डॉ.जयंत सावंत, डॉ.जयसिंग पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ सुनंदा पाटील, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. शितल सावंत, औषध निर्माण अधिकारी सौ.आर.एस.पाटील, प्रयोगशाळा तंज्ञत्र शरयू पाटील, कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ.हर्षल निकम, सर्व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे या शिबीरास सहकार्य लाभले.
कृष्णा कारखान्याच्या ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी
RELATED ARTICLES