कराड : महाराष्ट्र शासन अंतर्गत झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये शहिद भगतसिंग कॉलनी शास्त्रीनगर, कराड येथील विजय मच्छिंद्र पाटील हे राज्यात तिसर्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचा मित्रपरिवार तसेच नातेवाईक व नगरातील सर्वच राजकीय व सामाजिक स्तरांतुन भरभरून कौतुक होत आहे,
त्यांच्या या यशामागे सर्वस्वी त्यांच्या आई-बाबांचा हात आहे आणि त्यांनी त्यासाठी खुपच कष्ट घेतले आहेत असे विजय पाटील बोलताना म्हणाले,विजय पाटील यांचे वडील मच्छिंद्र पाटील ह्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये 33 वर्षे शिक्षक म्हणून काम केले आहे, सध्या ते सेवानिवृत्त झालेले आहेत,तसेच आई विद्या मच्छिंद्र पाटील ह्या सध्या दि मॉडर्न गर्ल्स हायस्कुल, ढेबेवाडी येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या ह्या यशाबद्दल मैत्री ग्रुप मुंबई (एक सेवाभावी नातं) या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कु. कृष्णा बापु साळुंखे व समस्त ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने चि. विजय पाटील व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करण्यात आले.
कराडचे विजय पाटील स्पर्धा परीक्षेत राज्यात तिसरे
RELATED ARTICLES