साताराःचंद्रपूर येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य सब जूनियर रग्बी फुटबॉल स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सातारा जिल्हा संघांमध्ये न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथील प्रांजली शेडगे,सिद्धी पिसाळ, कुणाल साळुंखे या विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता.व संघाच्या विजयांमध्ये मोलाची कामगिरी केली.
या खेळाडूंना न्यू इंग्लिश स्कूलच्या ऋतुराज घाटगे सर यांनी मार्गदर्शन केले.तसेच सातारा जिल्हा रग्बी असो.चे अध्यक्ष वीरभद्र कावडे व उपाध्यक्ष मनोज चव्हाण यांचे मार्गदर्शन मिळाले. या संघाविषयी माहिती देताना मार्गदर्शक ऋतुराज घाटगे म्हणाले की, प्रथमच यावर्षी न्यू इंग्लिश स्कूलच्यावतीने हा संघ सुरू करण्यात आला. दररोज शाळेच्या मैदानावर सकाळी 7 वा. हे खेळाडू उपस्थित राहून या खेळाची प्रॅक्टीस करतात. नुकत्याच झालेल्या शालेय स्पर्धेत जिल्हास्तरीय पातळीवर मुलांच्या व मुलींच्या संघाची विभागीय निवड होवून इ.10 वीतील शिकणारा अबिद आतार हा खेळाडू राज्यस्तरावर निवडला गेला आहे याचे मोठे कौतूक वाटते.
मुलांमुलींच्या संघाने मिळविलेल्या या यशाबद्दल शालेय समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी ,शाळेच्या शालाप्रमुख सौ स्नेहल कुलकर्णी, उपशालाप्रमुख दिलीप कांबळे, पर्यवेक्षक दिलीप रावडे सर ,सौ लता दळवी मॅडम ,सौ.निलम तिरमारे मॅडम, एनसीसी आर्मीचे मार्गदर्शक सुधाकर गुरव सर व शालेय क्रीडा विभागाच्या शिक्षकांनी यशस्वी खेळाडूंचे भरभरून कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सातारा जिल्हा रग्बी संघाने राज्यपातळीवर मुलींमध्ये द्वितीय तर मुलांमध्ये तृतीय क्रमांक पटकावला
RELATED ARTICLES