Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातारा जिल्ह्यात गणेश जयंती धार्मिक वातावरणात व विविध कार्यक्रमांनी साजरी

सातारा जिल्ह्यात गणेश जयंती धार्मिक वातावरणात व विविध कार्यक्रमांनी साजरी

सातारा ः मोरया, मोरयाच्या जयघोषात सातारा जिल्ह्यात शुक्रवारी माघ महिन्यातील विनायक चतुर्थी अर्थात तिलकुंद चतुथीला गणेश जन्म सोहळा विविध मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जयंतीनिमित्त सातारा शहर परिसरातील अनेक लहान मोठ्या गणेश मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारी 12 वा. गणेश जन्मकाळावर जन्मआख्यान, किर्तन तसेच महिलांनी श्रीफळ रुपी गणेशाला पाळण्यात घालून गणेश जन्मावर आधारीत पाळणागिते म्हटली, त्यानंतर महाआरती होवून सुंठवडा व तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला. यानंतर अनेक मंदिरात महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. गणेश जयंतीनिमित्त मंदिरातील गणेश मुर्तीना महाअभिषेक, पूजा, होमहवन, गणेश याग घालण्यात आल्या. तसेच अनेक मंदिरातून स्त्री पुरुष भक्तांनी गणेश स्तोत्र व गणेश अर्थवशीर्षाचे पठण केले.
सातारा शहरातील पंचमुखी गणेश मंदिर, राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश, फुटका तलाव येथील वरदविनायक, शुक्रवार पेठेतील विश्‍वविनायक, यादोगोपाळ पेठेतील सप्ततारा गणेश मंडळापुढे जन्मकाळाचे किर्तन के. पी.कुलकर्णी यांनी केले. तर गणेश यागाचे पैरोहित्य ओंमकार बोडस यांनी केले. गोलमारुती जवळील श्री सिध्दीविनायक मंदिर, नटराज मंदिर येथील महागणेश, कुबेरविनायक याशिवाय गावातील ग्रामदैवत समजल्या जाणार्‍या माची पेठेतील ढोल्या गणपती, कुरणेश्‍वर देवस्थान खिंडीतील गणपती, गुरुवार पेठेतील शकुनी गणपती, आदी मंदिरातून मोठ्या उत्साहात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत गणेश भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सातारा जिल्ह्यातील वाई येथील श्री ढोल्या गणपती, अंगापूर येथील श्री गणेश मंदिर, याशिवाय सज्जनगड, गोंदावले, फलटण, कराड, महाबळेश्‍वर, पाटण आदी शहरातील गणेश मंदिरातही गणेश जयंती उत्साहात साजरी झाली. दरम्यान,
संभाजीनगर ता. सातारा येथील लक्ष्मीनगर मधील सुर्यमुखी गणेश मंदिरात गणेश जयंती उत्सव विविध उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
गणेश जन्मकाळ निमित्त कोरेगावचे आ. शशिकांत शिंदे यांनी मंदिरास भेट देवून गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी भजनाचा लाभ भाविकांनी घेतला.दुपारी 12.30 वा. गणेश जन्मकाळ झाला. सर्व धार्मिक विधी वेदशास्त्र पंडीत उमाकांत वरुडकर यांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.
जनसेवा विकास मंडळाच्यावतीने गेल्या सात वर्षापासून सुर्यमुखी गणेश मंदिरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार, मुकबधीर शाळेला मदत, भूकंप व पुरनिधी, वृक्षारोपण, शासकीय योजनाचा प्र्रचार व प्रसार असे सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. मंडळाचे अध्यक्ष गोविंदराव सिंदकर, उपाध्यक्ष महादेव इंगवले, खजिनदार व्ही.बी.सपकाळ, सेक्रेटरी आर.वाय.कुंभार, सदस्य रविकांत पाटणकर, सुनिता फडतरे, समीर हवालदार, नंदकुमार पाटील, ग्रा.पं. सदस्य कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सोनगाव तर्फ सातारा येथील इंगळवाडी येथे गणेशजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त होम हवन, जन्मकाळ असे धार्मिक कार्यक्रम पार पडले.
सायंकाळी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. संतोष धोंडवड, बाळासाहेब धोंडवड, महेश बाबर, गुलाबराव यादव, भिकु यादव, श्रीरंग नावडकर, सरपंच पांडूरंग नावडकर, विजय पवार, हणमंत इंगळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले. संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular