Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसोनजाई मंदिराचा मंडप हुल्लडबाज युवकांमुळे जाळून खाक

सोनजाई मंदिराचा मंडप हुल्लडबाज युवकांमुळे जाळून खाक

पर्यटक म्हणून फिरायला आलेल्या तरुणांचे कृत्य
लाखो रुपयांचे मंडपाचे झाले नुकसान
वाई : वाई तालुक्यात वनवा लावण्याच्या प्रकारामुळे पर्यावरणासह मालमत्तेचेही मोठे नुकसान होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात सोनजाई मंदिराला संपूर्ण वर्षभर लाखो पर्यटक भेटी देतात, त्यात तरुणांची सख्या लक्षणीय असते. काहीजण ट्रेकिंग च्या निमित्ताने तर काही नियमित व्यायाम करण्याच्या उद्देशाने येतात, हे सर्वजण मंदीर परिसर पहाण्यासाठी पठारावर फिरत असतात. भक्त मात्र मंदिराशिवाय बाहेर कुठेही जाताना दिसत नाहीत. अशातील काही तरुण शुक्रवारी दुपारी मंदीर परिसरात फिरत असताना मंदिराच्या विश्वस्तांनी पाहिले होते. परंतु मंदीर परिसार फिरणारे युवक असे काही करतील अशी शंका सुध्दा आली नाही. दुपारी पाचच्या दरम्यात अचानक धुराचे लोट निघायला लागण्याने मंदिरातील विश्वस्त व भक्तांची एकाच धांदल उडाली, पाण्याचा सोर्स नसल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. त्यातच प्रचंड प्रमाणात वारे वाहत असल्याने आगीला कंट्रोल मध्ये आणने अवघड गेले परिणामी थोड्याच वेळात संपूर्ण सभा मंडप आगीच्या भक्षस्थानी पडला व जाळून खाक झाला, अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंडपाला आग लागल्याने विझविण्याच्या नादात सर्वजण असल्याचा फायदा घेत समाजकंटक युवक त्या ठिकाणाहून पसार होण्यात यशस्वी झाले. या हुल्लड बाजांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मंदीर विश्वस्त- मंगलगीरी महाराज, तुकारामगिरी महाराज, कुंडलगिरी महाराज, आनंदगिरी महाराज यांनी केली आहे. सोनजाई देवीचे भक्त संपूर्ण महराष्ट्रातून येत असतात. तसेच सोनजाई मंदीर हे अतिशय उंचावर व निर्जनस्थळी असल्याने या ठिकाणी हुल्लडबाजांची संख्या वाढताना दिसत आहे. नको ते धाडस करण्याच्या नादात अशा घटना घडतात, या ठिकाणी येणार्‍या प्रत्येक भक्तांवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असून संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवून कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच मंदीर परिसरात बिन्दास्त फिरणार्यावर रोक लावण्याची गरज यानिमित्ताने झाली आहे.
चौकाट:- लोकांच्या मदतीतून उभारलेल्या मंडपाचे झाले नुकसान:-
सोनजाई संपूर्ण वर्षभर मांढरदेवी सारखे देवीचे भक्त देवीच्या वारादिवाशी येत असतात. सोनजाई देवीचा नवरात्रात मोठा उत्सव भरत असातो, त्या नऊ दिवसात येणार्‍या भक्तांना होम-हावन करण्यासाठी एकत्रित पणे बसता यावे म्हणून विश्वस्तांनी लोकांच्या आग्रहास्तव हा मंडप उभा केला होता. यामध्ये एकावेळी नऊ होम पेटविण्यात येत असे त्यामुळे वीस जोडपी एकावेळी होम विधीसाठी बसण्याची सोय होत असे त्यासाठी काही दानशूर भक्तांनीच दानधर्म केल्यानेच ही सोय करण्यात आली होती. युवकांच्या एका चुकीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे:- मंगलगिरी महाराज, (विश्वस्त सोनजाई मंदीर)
मंदीर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज:- सोनजाई देवीचे भक्त मोठ्या प्रमाणात या गडावर येत असल्याने या ठिकाणी नेहमीच गर्दी होते.त्यामुळे व्यक्तीशः लक्ष ठेवण्यापेक्षा सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यास अशा समाज कंटकांना पकडणे सोपे जाईल व अशा चुकीच्या कृतींना आळा बसण्यास मदत मिळेल:- सोनजाई भक्त,

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular