कराड :- नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेण्यात आलेल्या जे ई ई मेन पेपर १ परीक्षेचा निकाल शनिवारी अवघ्या १२दिवसात जाहीर झाला हि परीक्षा प्रथमच पूर्णपणे फक्त ऑनलाईन स्वरूपात घेण्यात आली. या परीक्षेत ब्रिलियंट अकॅडमी कराड च्या विध्यार्थ्यानी दैदिप्यमान यश मिळवले असून संग्राम राजेंद्र जगदाळे या विद्यार्थ्याने सातारा, सांगली, सोलापूर जिल्हयात ९९.२३ पर्सेन्टाइल, (२५० मार्क्स) मिळवून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. सातारा जिल्हयात द्वितीय येण्याचा मान सुजित सुरेश मगर या विध्यार्थ्याला मिळाला असून त्याला ९८. ३३ पर्सेन्टाइल मिळाले आहेत.
या बरोबर रणजित विजय मोरे ९३.४६, केदार जगदीश कवाडे ९०,ऋतिक दिलीप देशमुख ८८.४०, केतन चव्हाण ८७.८४, ऋत्विज कांबळे ८५, संजना पाटील ८३, शिवम पवार ८०, ऋषीकेश कुंभार ७७, जाधव श्रावणी ७४, ई प्रमाणे पर्सेन्टाइल मिळाले आहेत. अत्यल्प विध्यार्थी संख्येतून (फक्त २०), आलेले विध्यार्थी हे कोणत्याही शाळेचे अथवा कॉलेज चे प्रथम क्रमांकाचे विध्यार्थी नव्हते तरीही पुन्हा एकदा ब्रिलियंट अकॅडमी ने शैक्षणिक दर्जा सिद्ध करत यशाची परंपरा कायम राखली आहे, या यशाबद्दल ब्रिलियंट अकॅडमी च्या संचालक मंडळ व स्टाफ तर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.
कायमस्वरूपी स्टाफ, वैयक्तिक लक्ष, भरपूर प्रॉब्लेम प्रॅक्टिस, डाउट सेशन, स्टडी रुम सुविधा ई मुळे हे यश संपादन करणे शक्य झाले. ब्रिलियंट अकॅडमी तर्फे २४ मार्च रोजी वेणूताई चव्हाण सभागृह कराड येथे दुपारी २ ते ५ या वेळेत करिअर मार्गदर्शन सेमिनार ‘दहावी नंतर पुढे काय?’ चे आयोजन केले आहे.आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी याचा लाभ जरूर घ्यावा. तसेच १ एप्रिल पासून ३ महिने जे ई ई व नीट ब्रिज कोर्स अगदी मोफत घेरण्यात येणार आहे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सर्व परीक्षांचे स्वरूप, तयारी, प्रीमियम नॅशनल इन्स्टिटयूट व त्यांच्या प्रवेश प्रक्रिया ई विषयी ची माहिती व तयारीला सुरुवात, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा पाय भक्कम करणेसाठी असणाऱ्या ब्रिज कोर्स चा लाभ, आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी पालकांनी जरूर घ्यावा असे आवाहन ब्रिलियंट अकॅडमी संचालक मंडळातर्फे करण्यात येत आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्य बाबत जागरूक राहणे अत्यंत जरुरी आहे काही अकॅडमी आपल्या निकालाची खोटी व पालकांना गोंधळात टाकणारी जाहिरातबाजी करत आहेत तरी पालकांनी पूर्वीच्या विध्यार्थ्यांच्या निकालाची प्रत पाहूनच विश्वास ठेवावा.
ब्रिलियंटचा संग्राम जे ई ई मेन परीक्षेत ३ जिल्हयात प्रथम
RELATED ARTICLES