सातारा : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पुणे यांच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार दै. ग्रामोध्दारचे ढेबेवाडी वार्ताहर व प्रेस मिडीया जर्नालिस्ट असो. प्रदेश उपाध्यक्ष तसेच 24 तास महाराष्ट्र फास्ट न्यूज चॅनलचे उपसंपादक सागर दिलीप पाटील यांना आज एस. पी कॉलेज टिळक हॉल पुणे येथे अभिनेत्री स्नेहल हेन्द्रे, नरेंद्र मोदी विचार मंच चे प्रदेश अध्यक्ष वासुदेव शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख म्हणून आ. विश्वजीत कदम, महापौर मुक्ता टिळक, विजय कदम, भगवानराव साळुंखे, निर्माता स्नेहल हिंगे, मनोज व्यवहारे, उपस्थित होते. दरम्यान, त्यांचे दै. ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव, व्यवस्थापकीय संपादक चंद्रसेन जाधव, व कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जि. प. सदस्य रमेश पाटील, तसेच मंद्रुळ गावचे ग्रामस्थ यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सागर पाटील सन्मानित
RELATED ARTICLES