Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीगुणवरे येथील गोळीबार प्रकरणी चार जणांच्या टोळीला अटक :स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

गुणवरे येथील गोळीबार प्रकरणी चार जणांच्या टोळीला अटक :स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सातारा : गुणवरे ता. फलटण येथील गोट्या भंडलकर याच्यावर गोळ्या झाडणार्‍या चार जणांच्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला महिनाभराच्या अथक प्रयत्नानंतर यश आले आहे. ही कारवाई कर्जत ता नगर येथे करण्यात आली असून गोटया भंडलकर वर झालेल्या गोळीबाराचे सत्य आता उजेडात येणार आहे. अमर धनराज बेदरे, वैभव सुर्यभान बेदरे (दोघे. रा. सुपे, ता. कर्जत,जि. नगर) ज्ञानेश्‍वर नारायण साबळे (रा.शिंदा, ता. कर्जत) कल्याण गावडे (रा.गुणवरे, ता. फलटण) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींनी गोट्यावर गोळ्या झाडण्यासाठी कल्याण गावडे याच्याकडून दहा लाखाची सुपारी घेतल्याचे कबुल केले आहे.
दि.28 डिसेंबर रोजी गुणवरे ते बरड जाणार्‍या रस्त्यावर गुलाब उर्फ गोट्या भंडलकर (रा. गुणवरे, ता.फलटण) याच्यावर पाठीमागून आलेल्या चौघांनी गोळीबार केला होता. यात गोट्या गंभीर जखमी झाला होता. त्याला फलटण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या जबाबावरून अज्ञातांच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यानच्या काळात गोट्याच्या नातेवाईकांनी मोर्चा काढला होता त्यामुळे गुणवरे गावात तणावं वाढला होता.
गुणवरे ता. फलटण येथील कल्याण गावडे व गोट्या भंडलकर यांच्यात जमिनीच्या ताब्यावरून वाद सूरू होता. गुणवरे येथील कल्याण याच्या वडीलांची जमिन जावली तालुक्यातील काही लोकांना पुर्नवसन कायद्याने मिळाली होती. मात्र त्या ठिकाणी पाण्याची सोय नसल्याने जावली तालुक्यातील लोक तिथे जमिन कसण्यासाठी आले नव्हते. त्यातील काही जमिन कल्याण याने साठेखत करून खरेदी केली होती. ती जमिन व अन्य काही हिस्सा गोट्या व त्याच्या काही मित्रांनी दमबाजी करून साठेखताने ताब्यात घेतली होता.
तेव्हापासून गावडे व भंडलकर यांच्यात सतत वाद सुरू होते. याच वादाच्या कारणातून कल्याण गावडे याने अहमदनगर जिल्ह्यातील मित्रांना बोलावून गोट्याचा घात करण्याची योजना आखली .त्यातूनच दि.28 डिसेंबर रोजी गोट्यावर बरडदरम्यान गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर हा तपास फलटण ग्रामीण पोलिसांच्याकडे होता. मात्र आरोपी हाती लागत नसल्याने जिल्हा पोलिस प्रमुखांनी तपासची सुत्रे स्थानिक गुन्हे शाखेकडे दिली होती.स्था गुषा ने कौशल्याने तपास करून चिवट पाठपुराव्यानंतर चार आरोपींना अटक केली . पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी या गुन्ह्याचा छडा लावून आपले तपासाचे खाते उघडले आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular