सातारा : जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधार्याचे काम करत असताना अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाला. यात एक मजूर गंभीर जखमी झाला. दादासो शामराव चव्हाण असे जखमी मजुराचे नाव असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधार्याचे काम सुरू होते. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सर्व मजूर बंधार्यावर काम करत असताना अचानक दगडाखाली गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्यामुळे चव्हाण गंभीर जखमी झाले. इतर कामगारांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, हा बॉम्ब याठिकाणी कोणी आणि का आणला होता, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जंगल परिसरात आणखी असे गावठी बॉम्ब असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याप्रकरणी कसून चौकशी व्हावी अशी मागणीही परिसरातील नागरिकांतून होत आहे.
वडाचे म्हसवे येथे गावठी बॉम्बच्या स्फोटात मजूर जखमी
RELATED ARTICLES