पाटण:- किल्ले सुंदरगडावर (दातेगड) मंगळवार दि.-१९ फेब्रुवारी रोजी साजरा होणारा शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुंदरगड (दातेगड) संवर्धन समिती आणि ग्रामस्थ टोळेवाडी येथील छत्रपती शिव मावळ्यांनी कंबर कसली असुन सोमवार दि. १८ फेब्रु. आणि मंगळवार दि.१९ फेब्रु. रोजी छत्रपती शिवजयंती निमित्त सुंदरगडावर भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी टोळेवाडी येथे छत्रपती शिव मावळ्यांची बैठक झाली.
यावेळी सोमवार दि.१८ आणि मंगळवार दि.१९ फेब्रु. रोजी सुंदरगडावर शिवजयंती सोहळा साजरा करताना सोमवारी दु. २ वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेची प्रतिष्ठापना, शिवज्योत प्रज्वलन, छत्रपती शिव वंदना, ४ ते सांयकाळी ६ वा. पर्यंत शिवप्रेमी यसुफ हकीम यांचे उत्सफुर्त शिवव्याख्यान व अनिल बोधे यांचे शिवकाव्य. सांयकाळी ७ ते ८ शिवमशाल प्रदक्षिणा रात्री ९ ते १२ शाहिरी शिव पवाडे, गोंधळ कार्यक्रम, रात्री १२ वा. पुढे पहाटे पर्यंत टोळेवाडी, घेरादातेगड, मेष्टेवाडी, कातवडी, पिंपळोशी कारवट, घाणबी, वाटोळे, जाईचीवाडी, केर, बोंद्री, येराड, काळोली, तामकणे येथील भजनी मंडळांचा शिवजागर (भजन) असे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कर्यक्रमाला शिवप्रेमी, शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आहवान सुंदरगड (दातेगड) संवर्धन समिती आणि टोळेवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे.
दरम्यान सुंदरगडाच्या (दातेगड) सुरक्षेतेसाठी व शिस्तीसाठी गडावर संवर्धनासाठी येणाऱ्या संघटना, टिम, शिवप्रेमी यांनी गडावरील इतिहासीक वास्तू, व दुर्मिळ वस्तू यांच्या सुरक्षतेसाठी ग्रामपंचायत टोळेवाडी आणि सुंदरगड (दातेगड) संवर्धन समिती यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. गडावर संवर्धन करताना सापडलेल्या इतिहासीक पुरातन वस्तू यांना कोणतेही बाधा न पोहचविता व परस्पर कोठेही न नेता अशा इतिहासीक वस्तू ग्रामपंचायत टोळेवाडी व सुंदरगड संवर्धन समिती यांच्याकडे स्वपरुद कराव्यात त्या परस्पर कोठेही नेल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाच्या कायदेशीर कारवाई करण्यात येतील. असे निर्णय हि या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीस ग्रामपंचायत टोळेवाडीचे जेष्ठ नागरीक माजी सरपंच नारायण डिगे, आनंदा सांळुखे, शंकर सांळुखे, नथुराम साळुंखे, मच्छिंद्र सूर्यवंशी, ज्ञानदेव साळुंखे, शांताराम साळुंखे, यशवंत साळुंखे, संवर्धन समितीचे सदस्य शंकरराव कुंभार, चंद्रहार निकम, महादेव खैरमोडे, मनोहर यादव, यसुफ हकीम, मंगेश पाटणकर, लक्ष्मण चव्हाण, अनिल बोधे, शंकर मोहिते, निलेश फुटाणे, अंकुश साळुंखे, रामचंद्र साळुंखे आदी ग्रामस्थ संवर्धन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.