Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीजिल्हा माहिती कार्यालयाच्या वंचितांच्या विकास वाटा या घडीपुस्तिकेचे सामाजिक न्याय आणि विशेष...

जिल्हा माहिती कार्यालयाच्या वंचितांच्या विकास वाटा या घडीपुस्तिकेचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

सातारा : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वंचितांच्या विकास वाटाफ या घडीपुस्तिकेचे प्रकाशन आज सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन कवले, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, नगरसेवक धनंजय जांबळे, विजय काटवटे, अशोक गायकवाड, अनिल देसाई, विठ्ठल बलसेटवार, बबनराव कांबळे, अण्णा वायदंडे आदी यावेळी उपस्थित होते.
या घडीपुस्तिकेत भारत सरकाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, व्यावसायीक पाठ्यक्रमाशी संलग्न विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना, अनूसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने वाटप योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, रमाई घरकुल योजनांची माहिती व योजनांची माहिती या पुस्तिकेत प्रकाशित करण्यात आली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular