Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीविरोधकांकडून मंजुरी नसणार्‍या प्रस्तावित कामाच्या भूमिपूजनाचे उद्योग: राजाभाऊ शेलार

विरोधकांकडून मंजुरी नसणार्‍या प्रस्तावित कामाच्या भूमिपूजनाचे उद्योग: राजाभाऊ शेलार

पाटण: लोकनेत्यांविषयी आमच्या मनात नितांत आदर आहे. मात्र काहीजण गेली अनेक वर्षे लोकनेत्यांच्या नावाने राजकारण करत करत आहेत. लोकनेत्यांच्या नावाचे राजकारण अजून किती दिवस चालणार? अधिकार्‍यांना हाताशी धरुन प्रस्तावित कामाच्या मंजुरीचे पत्र घ्यायचे आणि भूमिपूजने करत सुटायचे हे उद्योग विरोधकांनी सुरु केले आहेत. असा टोला लगावून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून चांगली कामेे सुरू आहेत. शहरातील नागरीकांनी फसव्या गोष्टींपासून सावधान रहावे. असे आवाहन पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी केले.
पाटण नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील प्रभाग क्र.14 मध्ये चाँद हकीम ते हारूण इनामदार, नगारजी यांच्या घरापर्यंत मंजूर झालेल्या आरसीसी रस्ता काँक्रीटीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती उज्वलाताई जाधव होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, नगराध्यक्षा सुषमा महाजन, उपनगराध्यक्ष दीपक शिंदे, नगरसेवक सचिन कुंभार, अनिता देवकांत, विजय टोळे, अजय कवडे, उमेश टोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजाभाऊ शेलार म्हणाले. 2000 साली कोकिसरे गावात शाळा आम्ही मंजूर केली आणि विरोधकांनी भुमिपूजनाचा घाट घातला. मात्र लोकाच्या आग्रहाने आम्ही त्याचे भूमिपूजन केले. आज आत्ता तिथे शाळा उभारलेली आहे. तसाच काहीसा प्रकार आज घडला आहे. पाटण नगरपंचायतीने मंजूर केलेल्या कामाचे श्रेय विरोधक घेत आहेत ही दुर्दैवाची बाब आहे. ज्यांनी काम केले त्यालाच श्रेय गेले पाहिजे. विरोधकांचे काम प्रस्तावित असणार आहे ते मंजूर झालेले नसणार आहे. कारण बर्‍याच विभागात विरोधक असे चित्र निर्माण करत आहेत. भूमिपूजनाच्या फसव्या पाट्या अनेक ठिकाणी लागल्या असून काम काही होणार नाहीत. अधिकार्‍यांना पत्रे द्यायला लावून चुकीच्या पध्दतीने गल्लीबोळात, गावागावात उद्वेश निर्माण करून कामे विरोधक करत आहेत. तो पयत्न हाणून पाडण्याचे काम सर्वांनी करावे. पाटण शहरात स्वच्छतेबाबतचे दिशादर्शक काम सुरू आहे. नगरपंचायतीत रूपांतर झाल्यावर शहरात कोणत्या पध्दतीने कामे केली हे नागरीकांना दाखवून द्या आणि त्या कारभाराला मत द्या असे नागरीकांना सांगा. असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष दीपक शिंदे म्हणाले. दादांच्या माध्यमातून पाटण शहराचा विकास होत आहे. याचा आपल्याला अभिमान वाटतो. नगरपंचायतीने शहरातील लोकांची गरज ओळखून विकासकामे दिली आहेत हे जनता उघड्या डोळ्यांनी पहात आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी जनता सूज्ञ आहे. नगरपंचायत व लोकांच्या हाकेला दादा सदैव तत्पर आहेत. यापुढेही सत्यजितसिंह पाटणकर दादांचे हात बळकट करुयात आणि त्यांना विधानसभेत पाठवूयात, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात नगरसेवक सचिन कुंभार म्हणाले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते सत्यजित दादा यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीच्या माध्यमातून पाटण शहरामध्ये कोटी लाखाची कामे सुरु आहेत. स्वच्छ भारत अंतर्गत कामे सुरु आहेत. घंटा गाडीमुळे लोक सर्व कचरा गाडीतच टाकत आहेत. पाटण शहरातील कोणतीही व्यक्ती पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी 33 कोटीची 24 बाय 7 ही योजनेचे काम लवकरचं सुरु होत आहे. दादांमुळे कोट्यवधींची कामे सुरु असल्याने आम्हाला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. नगरविकास खात्यामुळे नगरपंचयातीला कामांसाठी निधी मिळत आहे. मात्र पाटणमध्ये विरोधकांनी एक रुपयांचे काम केलेले नाही. आम्ही मंजूर केलेल्या कामाची विरोधकांनी भूमिपूजने ठेवली आहेत. आम्ही लोकांना विश्वासात घेऊन राजकारण न करता कामे करत आहे. विरोधक मात्र कामात राजकारण आणत आहेत. दादांची शिकवण घेऊन आम्ही काम करत असून दादांचे योगदान पाटणसाठी मोलाचे आहे. असे त्यांनी सांगितले.
नगरसेवक अजय कवडे व अनिता देवकांत यांनी सर्वांचे स्वागत केले. उपनगराध्यक्ष दीपक शिंदे यांनी आभार मानले. चंद्रकांत मोरे, राजेंद्र राऊत, अशोक गजरे, इक्बाल गडकरी, आनंदराव चौधरी, इब्राहीम हकीम, लियाकत हकीम, इम्रान हकीम, मन्सुरभाई इनामदार, आसिन मुकादम, मोसीन पालवनकर, जयवंतराव पवार, जयवंत सुर्वे, संजय खराडे, शोएब शेख, कय्युम हकीम, अमजद हकीम, आयुब शेख, रमेश टोळे, रज्जाक हकीम, मुबारक सरकवास, दर्शन कवर, साईराज कवर, रणजित खराडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular