सातारा : आपल्या कृतीने दुसर्याला आनंद देवून आपल्या आनंदात भर घालावी, दसर्याच्या आनंदात मन:पुर्वक सहभागी व्हावे या विचाराने श्री मोहन पुरोहित यांचा जीवनप्रवास सुरु आहे. हिच त्यांच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. हा त्यांनी इतरांना दिलेला संदेश आहे. असे विचार निवृत्त सहाय्यक विक्रीकर आयुक्त विनायक आगाशे यांनी मोहन पुरोहित यांच्या एकसष्टी समारंभाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून व्यक्त केला. समारंभाच्या आरंभी सातारा हॉटेल मालक संघातर्फे अध्यक्ष राजू भोसले यांनी मोहन पुरोहित यांना मानाचा फेटा बांधून आणि शाल व श्रीफळ देवून त्यांचा यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाचे आयोजन प्रसिध्द कापड व्यावसायिक विनोद राणे, जगदीश कासट, आणि खूशराज पुरोहित यांनी केले होते. या प्रसगी लायन्स जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख श्री प्रभाकर आंबेकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्री प्रकाश बडेकर, सातारा जेसीसचे अध्यक्ष सुभाष जाजू या मित्र परिवाराने देखील यथोचित भाषण करुन मोहन पुरोहित यांचा गौरव केला.
सत्काराला उत्तर देताना मोहन पुरोहित यांना आपल्या मित्र परिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन भविष्य काळात देखील मैत्रीचे संबंध दृढ व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमास भवरलाल पुरोहित, ठाकूरभाई शहा, गणपतराव मोहिते, रफीक शेख, सतीश रावसंडे, प्रदीप शहा, व्दारका उधाणी, सतिश गुजर, शिवकुमार चौरसिया, सतिश कुलकर्णी दत्ताजी उत्तेकर, श्रीनिवास देसाई, कुंदप, उधाणी, प्रमोद लाहोटी, विनोदी लाहोटी, डॉ. मोहन पाटील, किशोर घोडके, राजन देशमाने, परेश गांधी, प्रमुख पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खुशराज पुरोहित यांनी मानले.
आनंद देवून आनंद मिळवावा : विनायक आगाशे
RELATED ARTICLES