वाई: बावधन येथील विजयसिंह पिसाळ युवा मंच आणि सातारा जिल्हा फेडरेशन बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचा बावधन श्री 2019 होण्याचा मान आदिल बागवान, वाई यांना मिळाला आहे. तर बेस्ट पोझर म्हणून सातारा येथील रुपेश लाटकर, याला आणि मोस्ट मस्कुलर म्हणून बावधनच्या सुधीर गायकवाड यांना गौरविण्यात आले.विजयसिंह पिसाळ मित्र समूहाच्या नियोजबद्ध कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शरीर सौष्ठव सारख्या स्पर्धा ग्रामीण भागात सहसा घेतल्या जात नाहीत.बावधन गावामध्ये दोन वर्षपूर्वी सुरू झालेल्या अल्टीमेट फिटनेस जिम सुरू करण्यात आली होती.या जिम चा प्रतिसाद पाहून विजयसिंह पिसाळ यांनी बावधन गावामध्येच शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धेच्या दुसर्या वर्षी त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला.आ.मकरंद पाटील यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत संयोजकांचे कौतुक केले. ग्रामीण भागात अशा वेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून विजयसिंह पिसाळ युवा मंचने अशा खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून दिल्याचे सांगितले.
या स्पर्धेच्या आयोजनाबाबत बोलताना विजयसिंह पिसाळ म्हणाले,खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करून देण्यावर युवा मंच भर देणार असून या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनातून आम्हाला आणखी चांगल्या स्पर्धा भरविण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.यापुढेही आम्ही विविध स्पर्धा भरवून ग्रामीण भागातील टॅलेंट प्रकाशात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
तब्बल 1 लाख रुपयांची पारितोषिक असलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यसाठी प्रायोजक चॉकलेट बिकलेटचे संचालक अभिजित फरांदे, ज्योती कन्स्ट्रक्शनचे संचालक नितीन जगताप यांनी विशेष सहकार्य केले.तर पंच म्हणून आशियाई पंच तथा महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र हेंद्रे, राष्ट्रीय पंच,मुरली वत्स, अॅड नितीन माने, राज्य पंच,अमित कासट, सचिन तिरोडकर, जिल्हा पंच अनिल फुले यांनी तर स्टेज मार्शल म्हणून धनंजय चौगुले यांनी काम पाहिले. स्पर्धेत 80 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.यामध्ये
50 ते 55 वजनगटात सुधीर गायकवाड बावधन याने, 55 ते 60 वजनगटात शुभम बनकर वाई , 60 ते 65 किलो वजन गटात संतोष वाडेकर शिरवळ, 65 ते 70 किलो वजनगटात विक्रम करांडे,कराड,70 ते 75 वजन गटात कमरलली मुतुवल्ली कराड यांनी आणि 75 च्या पुढील वजन गटात आदिल बागवान वाई याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
बावधन श्री अशा तीन मुख्य बक्षीसां बरोबरच प्रत्येक वजन गटातील पाच स्पर्धकांना सन्मानचिन्ह व पदक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट म्हणजे अल्टीमेट जिम बावधनचे संचालक सुधीर गायकवाड यांनी 50 ते 55 किलोगटामध्ये प्रथम क्रमांक व मोस्ट मस्क्यूलर या दोन्ही पदके मिळवून जिम मधील नव्या सहकार्यांसमोर आदर्श निर्माण करून ठेवला.स्पर्धेचे सूत्रसंचालन संदीप प्रभाळे यांनी केले.तर आभार प्रशांत पिसाळ यांनी मानले.
यावेळी आ.मकरंद पाटील, अरुणादेवी पिसाळ,शशिकांत पिसाळ, शारदा ननावरे, विजयसिंह नायकवडी, दीपक ननावरे,चंद्रकांत भोसले, अंकुश कुंभार, नितीन कदम, विलास पिसाळ, प्रतापराव पिसाळ, रोहिणी ननावरे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नितीन जगताप, लता चव्हाण,नीता लावंड, शिवाजी भोसले, दिनकर नायकवडी, संदीप मानकुमरे, राजेंद्र चव्हाण सरपंच पप्पूराजे भोसले, तानाजी कचरे कांतीलाल भोसले, संतोष पिसाळ, अमोल जाधव, लक्ष्मणराव पिसाळ, सचिन येवले, नानासाहेब पिसाळ, गणेश भोसले, आदींसह विजयसिंह पिसाळ युवा मंच चे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
बावधन श्री चा मानकरी ठरला आदिल बागवान
RELATED ARTICLES