Thursday, March 28, 2024
Homeठळक घडामोडीभ्याड हल्याचा निढळकरांनी केला निषेध

भ्याड हल्याचा निढळकरांनी केला निषेध

पुसेगाव: जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे पाकिस्तानी अतिरेक्यानी केलेल्या भ्याड हल्यात 49 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेने सारा देश हादरून गेला या हल्ल्याच्या निषेधार्त निढळमधील सर्व नागरीक रस्त्यावर उतरले.
सर्व महीला,लहान बालकांबरोबर जेष्ठ नागरिक आणि युवकांनी हातात मेणबत्ती घेऊन जवानांना आदरांजली अर्पण केली. अतिरेक्याच्या या नीच कृत्याचा निषेध म्हनुन पाकिस्तानचा पुतळा जाळून जाहिर निषेध करण्यात आला, तसेच शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सदर प्रसंगी गावातील सर्व तरुण वर्ग, महिला व पुरुष मडंळी मोठया संख्येने सहभागी झाले.
यावेळी भारत माता कि जय, शाहिद जवान अमर रहे या घोषणांनी परीसर दुमदूमून गेला. पाकिस्तान मुर्दाबाद या प्रकार च्या घोषणा देत संध्या 7 वाजता संपुर्ण गावातुन कॅडल मार्च काढण्यात आला त्यानंतर मुख्य चौकात सर्व नागरिक एकवटे आणि एकिचा संदेश दिला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular