Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीगोपूज परिसरातील बेकायदेशीर उत्खननाविरोधात जनता क्रांती दलाचे लोकशाही मार्गाने आंदोलन

गोपूज परिसरातील बेकायदेशीर उत्खननाविरोधात जनता क्रांती दलाचे लोकशाही मार्गाने आंदोलन

औंध: गोपूज ता. येथे भावलिंंग डोंगर परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या एका कंपनीच्या खडी, दगड उत्खननाविरोधात जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने व पदाधिकार्‍यांनी खाणीमध्ये उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन केले. यावेळी आंदोलनस्थळी बोलताना सत्यवान कमाने म्हणाले संबंधित कंपनीने तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना घेऊन मूठभर अधिकारी वर्गास हाताशी धरून पन्नास हजार पेक्षा जास्त ब्रास खडी, दगड उत्खनन केली आहे
यामुळे पर्यावरणाची फार मोठी हानी होत असून वायू प्रदूषण, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोपूज परिसरातील घरांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत बेकायदेशीरपणे सुरू असलेले उत्खनन बंद करण्यासाठी सोमवारी हायकोर्टात रिट याचिका दाखल करणार असून याबाबत संबंधित अधिकारी व कंपनीच्या कामाच्या चौकशीची मागणी करणार आहेत तसेच आपले वडूज येथे सुरू असलेले आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू ठेवणार आहोत. एखाद्या सामान्य व्यक्तीने वाळू, मुरूम जरी घेतला तर हेच अधिकारी त्यांना पाच पट, दहा पट दंड करतात मग या बडया भांडवलदारांना अभय का? त्यांच्या कडूनही नियमानुसार दंड वसूल करून, कायदेशीर कारवाई करावी ते पुढे म्हणाले, शासनामार्फत केली जाणारी विकासकामे जरूर झाली पाहिजेत त्यास आमचा विरोध नाही मात्र ती कोणाचे नुकसान करून केली जाऊ नयेत हीच आमची अपेक्षा आहे.
यावेळी उपस्थित पदाधिकार्‍यांनी दोषी कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.यावेळी मंडलाधिकारी तोडरमल यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी विकास सकट, अ‍ॅड.संतोष कमाने, राजेंद्र नामदास, प्रतिक बडेकर, दत्ता केंगार, भीमराव नामदास, सागर फाळके, रमेश सकट, किशोर मोरे, प्रशांत भोंडवे, अमित उमापे, विशाल मोरे,संतोष दुबळे, दाऊद खान मुल्लाअर्जुन कमाने व कार्यकर्ते उपस्थित होते. सपोनि सुनील जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular