Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीहिंदू- मुस्लिम राष्ट्रीय एकतेचा पाटण येथे ऊर्स शरीफ.

हिंदू- मुस्लिम राष्ट्रीय एकतेचा पाटण येथे ऊर्स शरीफ.

 

पाटण:- रामापुर ( पाटण ) येथील पीर हजरत ख्वौजा कबुला हुसैनी चिष्ती यांचा ऊर्स शरीफ मंगळवार दि. २६, बुधवार दि. २७ आणि गुरवार दि. २८ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमांनी साजरा होत आहे.

या ऊर्स निमीत्त हिंदू- मुस्लिम सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन मंगळवार दि. २६ फेब्रुवारी पासून सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या ऊर्स शरीफ कार्यक्रमात हिंदू- मुस्लिम  राष्ट्रीय एकतेचे दर्शना बरोबर बुधवार दि. २७ रोजी रात्री ८.३० वा. संदल शरीफ ( गंधरात्र ), तसेच
रात्री १० वा. हिंदी- मराठी कव्वाल किंग आंतरराष्ट्रीय व फिल्म जगतातले सुप्रसिद्ध कव्वाल किंग निगामी बंधू यांचा कव्वाली चा कार्यक्रम होणार आहे. तर तिसऱ्या दिवशी गुरुवार दि. २८ रोजी उर्स शरीफ साजरा होणार आहे. हे सर्व कार्यक्रम दर्गा परिसर पाटण ( रामापुर ) येथे होणार आहे.  या ऊर्स शरीफ कार्यक्रमासाठी सर्व हिंदू- मुस्लिम, समाज बांधवांनी यावे असे आवाहन हिंदू- मुस्लिम ऊर्स कमेटी पाटण – रामापुर, फुरुस ता. खेड, खानखा-ऐ-हजरत ख्वाजा गरीब नवाज बंदे नवाज गेसुदराज कँम्प पुणे यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular