Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीविद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवसाचा आनंद ; युवा उद्योेजक निलेश थोरात यांच्याकडून खाऊ...

विद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवसाचा आनंद ; युवा उद्योेजक निलेश थोरात यांच्याकडून खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप

मायणी : मायणी (ता. खटाव जि.सातारा) येथिल युवा उद्योजक आणि व्यपारी निलेश थोरात यांनी अनावश्यक खर्च टाळत अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला.
वाढदिवसानिमित्त ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या लक्ष्मीनगर येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
शनिवारी (दि.२३) विद्यार्थ्यांसोबत आपला आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करताना चिमुकल्या विद्यार्थ्यांना देखिल आनंदात सहभागी करून घेतले. निलेश थोरात या तरूणाचा उपक्रम इतरांसाठी नक्कीच आदर्शवत व प्रेरणादाई असा आहे.
आजच्या काळात तरूणांनी सामाजिक भान जपत समाजाशी आपली बांधीलकी जपावी यासाठी हा अनोखा उपक्रम आदर्शवत आहे. निलेश हा या शाळेचा माजी विद्यार्थी. ज्या शाळेत आपण शिकलोे, समाजात कसे जगावे, कसे वागावे याचे संस्कार जेथे घडले त्याबद्दलची कृतज्ञता व शाळेबद्दलचे प्रेम यामुळेच वाढदिवसाचा हा अविस्मरणीय क्षण शाळेत जाऊन साजरा केला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक रमजान इनामदार व शिक्षिका छाया पाटील यांनी देखिल या उपक्रमाचे कौतूक केले व माजी विुद्यार्थ्यांनी शाळेचे प्रेम असेच जपावे असे सांगीतले. यावेळी निलेश थोरात , घन:शाम थोरात,अनुराधा थोरात व कुटूंबीय उपस्थित होते.
निलेश थोरात म्हणाले की, अनावष्यक खर्च करण्यापेक्षा शाळेतील विद्यार्थ्यांसोेबत वाढदिवस साजरा करण्याचे मनात आले. तसेच आपण या शाळेत शिकलो शाळेबद्दलची ओढ आज देखिल आहे. म्हणून विद्यार्थ्यांसोबत आनंद साजरा केला. तसेच घन:श्याम थोरात म्हणाले, यापुढे ही शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत काही मदत करणार अाहे. शाळेबद्दल असणारे आमचे यापुढे देखिल असेच राहील.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular