Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकोयना प्रकल्पग्रस्त मंत्रालयावर धडकणार

कोयना प्रकल्पग्रस्त मंत्रालयावर धडकणार

पाटण: पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुसर्‍या टप्प्यातील निर्णायक ठिय्या आंदोलन कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सुरूच आहे. कोयनानगर येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोयनानगर सह जिल्ह्यातील वांग मराठवाडी, बामणोली व जिल्हयातील 9 जिल्ह्यात प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन 12 फेब्रुवारी पासून सुरुच आहे.
दि.15 फेब्रुवारी रोजी कोयनानगर येथील आंदोलनात कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या मंजूर करण्यात आलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणी बाबतीत मुख्यमंत्र्यांच्या सोबत येत्या 8 दिवसांत बैठक लावली नाही तर कोयनाप्रकल्पग्रस्तांच्या सह 9 जिल्ह्यात आंदोलनास बसलेले प्रकल्पग्रस्त चालत लाँगमार्चने मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर धडकणार असा इशारा दिला होता. त्यास शनिवारी 8 दिवस झालेत. पण प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यासोबत मिटींगसाठी हालचाल झालेली दिसत नाही. त्यानुसार पाटण तालुका श्रमिक मुक्ती दलाच्या तालुका कार्यकारणीने कोयनानगर येथील ठिय्या आंदोलनातील आंदोलकाची लाँगमार्चची तयारी केली असून कोयनानगर येथून लाँगमार्चस सुरवात होणार आहे.
पाटण तालुक्यातील राममळा, वाजेगाव, येराड, म्हावशी, अडूळ, मल्हारपेठ, उरूल व उंब्रज या ठिकाणी दुपारचे जेवण, विश्रांती व मुक्काम होणार आहेत. उंब्रज येथे कोयनानगर येथील आंदोलकांसह वांग- मराठवाडी, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी आंदोलनास बसलेले प्रकल्पग्रस्त लाँगमार्चने एकत्र येऊन पुढे सातार्‍याच्या दिशेने निघणार आहेत. शासन आमचा अंत पाहत आहे. आता काही झाले तरी माघार घेणार नाही. मान्य केलेले पदरात पाडूनच माघारी येणार असा ठाम निर्धार कोयना प्रकल्पग्रस्त जनतेने केला आहे. लाँगमार्चची तयारी पूर्ण झाली असून कोणत्याही क्षणी आम्ही प्रकल्पग्रस्त ऊन वारा. थंडी याची पर्वा न करता मुंबईच्या दिशेने चालत मंत्रालयावर धडकणारच असा इशारा कोयना प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष संजय लाड, सचिव महेश शेलार, संघटक सचिन कदम, डि डि कदम, सिताराम पवार, विठ्ठल सपकाळ, संतोष कदम, भागवत जाधव, परशुराम शिर्के, अर्जुन सपकाळ, शिवाजी साळुंखे, दत्ता देशमुख, आनंद ढमाल, यांच्या सह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular