Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीजिल्हाधिकार्‍यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करून प्रकल्पग्रस्तांचा आत्मक्लेश

जिल्हाधिकार्‍यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करून प्रकल्पग्रस्तांचा आत्मक्लेश

पाटण: पाटण तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुसर्‍या टप्प्यातील निर्णायक ठिय्या आंदोलन सुरूच असून सोमवारी आंदोलनाच्या 14 व्या दिवशी कोयना प्रकल्पग्रस्त जनतेने आत्मक्लेश आंदोलन करून जिल्हाधिकारी श्रीमती श्‍वेता सिंघल यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला.
जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या वेळोवेळी होणार्‍या आंदोलनामुळे जिल्हा प्रशासनावर दबाव येत असून आम्हास त्रास होत आहे असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज कोयनानगर येथे प्रकल्पग्रस्त जनतेने सोम दिवसभर उपवास धरून आत्मक्लेश आंदोलन केले. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली
कोयना प्रकल्पग्रस्त जनतेने पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत गतवषीॅ कोयनानगर येथे तब्बल 15 दिवस आंदोलन केले होते, त्या आंदोलनात धरणग्रस्तांची तिसरी -चौथी पिढी सहभागी होती, त्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक घेऊन काही मागण्या तीन पूर्ण करु असे आश्वासन दिले होते. पण 10 महिने उलटले तरी स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून मंजूर मागण्यांच्या अंमलबजावणी बाबतीत चालढकल व अतिशय संथ गतीने काम सुरू आहे. त्यामुळेच अशा अकार्यक्षम प्रशासनाच्या बेजबाबदार कामामुळे कोयना प्रकल्पग्रस्त जनतेवर दुस-यांदा आंदोलन करायची वेळ आली याला जबाबदार तुम्हीच आहात. बेताल वक्तव्य करून धरणग्रस्तांचा अंत पाहू नये. आम्हा धरणग्रस्त जनतेला आमची मुले -बाळे, घर-दार, संसार सोडून आंदोलन करायची हौस नाही. आपल्या बेजबाबदार व्यक्तव्याने आपल्याला गेले 63 वर्षे आपल्या न्याय हक्कासाठी अहोरात्र संघर्ष करणार्‍या कोयना प्रकल्पग्रस्त जनतेविषयी व त्यांच्या प्रश्नांविषयी जिल्हाधिकारी म्हणून किती आत्मियता आहे हे दिसत आहे. असा संतप्त सवाल कोयना प्रकल्पग्रस्त आंदोलक महिलांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी अधिकारी तुपाशी, धरणग्रस्त उपाशी, कोयना धरणग्रस्तांचा विजय असो, मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे अशा घोषणांनी आंदोलक जनतेने कोयना काठ दणाणला.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे हरिश्चंद्र दळवी, अध्यक्ष संजय लाड, चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम,अर्जुन सपकाळ, विठ्ठल सपकाळ, सिताराम पवार, महादेव यादव, दत्ता देशमुख, चंद्रकांत कदम,नरसिंग देशमुख ,वासंती विचारे, कविता कदम यांच्या सह सर्व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular