Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीविकासकामे करताना टक्केवारीचा आकडा पाहत नाही : आ. शिंवेंद्रराजे

विकासकामे करताना टक्केवारीचा आकडा पाहत नाही : आ. शिंवेंद्रराजे

परळी : परळी खोर्‍याच्या डोंगर कपारीतील गावासह वाडीवस्तीतील विकासकामे करताना कधीही मतदानाची टक्केवारी पाहीली नसुन परिसरात अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत येत्या काळात रसत्यासह प्रमुख कामे शासनाकडे पाठपुरावा करून मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी सांडवली येथील पदमावती देवीच्या मुर्ति प्राणप्रतिस्थापन कलशारोहन व सभामंडपाच्या उदघाटनप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात बोलताना केले.ि
सांडवली येथे राविवारी ग्रामदेवीच्या मुर्तिस्थापन कळसारोहन व सभामंडप उदघाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला सभामंडपाचे उदघाटन आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले व कलशारोहन नितिन (बुवा ) जोशी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला भाई वांगडे (संस्थापक. शिवसह्याद्री पतपेढी), राजूभैय्या भोसले. (मा.जि प सदस्य.) कमलताई जाधव ( जि प सदस्या ). जितेंद्र सावंत (उपसभापती पंचायत समिती) शंकरराव च0हाण. बाळासाहेब खबाळे-पाटील, श्रीरंग केरेकर, लक्ष्मण जानकर, सरपंच गणेश चव्हाण बाबुराव कोकरे आदी मान्यवर व परिसरातिल शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवेंद्रसिहराजे भोसले पुढे म्हणाले की परळी भागासह डोंगरीभाग भाऊसाहेब महाराजांपासुन माझ्या पाठीशी कायम ठाम राहिला असुन मी लोक प्रतिनिधी मन्हुन या भागात मतदानाची टक्केवारी न पाहता विकासकामे केली असुन उर्वरीत कामांची सल तुमच्यासारखीच माझ्या मनात कायम असुन येत्या काळात शासनाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून तिही मार्गी लावली जातील सांडवली च्या रसत्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न त्वरीत मार्गी लावणार असुन पळसावडे धरणाजवळील पावसात रस्ता खचण्याचा प्रश्न अनुत्तरीतच असला तरी कायमचा प्रश्न सुटण्यासाठी वरीष्ठ पातळीवर संबधीत अधीकार्‍यांशी चर्चा करुन मार्ग लावणार असल्याची ग्वाहीही आमदार शिवेंद्रराजेनी दिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular