Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीमयत मुलीच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या पोलिस फारुख शेख याच्या विरोधात कारवाई होण्याची मागणी

मयत मुलीच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या पोलिस फारुख शेख याच्या विरोधात कारवाई होण्याची मागणी

पाटण:- सासरच्या लोकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलीच्या माहेरच्या लोकांनी पोलिसात तक्रार देवू नये यासाठी सातारा पोलिसात कार्यरत असणारे फारूख बशीर शेख यांनी मुलीच्या नातेवाईकांना पोलिसात तक्रार दिल्यास तुमच्या सर्वांचा बाजार करीन अशी धमकी देवून मुलीच्या माहेरकडील पिढीत लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या पदाचा गैरवापर करून दमदाटी केल्याने संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पाटणमधील मुस्लिम बांधवांसह इतर समाजातील लोकांनी तहसीलदार रामहरी भोसले व सपोनि उत्तमराव भापकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख, प्रांताधिकारी पाटण व यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे, पाटण येथील नफिसा अशफाख शेख या विवाहित मुलीने तिच्या सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तिची डेड बॉडी पाटण येथे माहेरी आणली होती. तिचे भाऊ, भावजई व कुटुंबिय या घटनेने खचून गेले असल्याने त्यांची मानसिक अवस्था ढासळली होती. यावेळी पाटण मधील मुस्लिम समाजातील महिला, पुरूष व इतर समाजातील लोकही मोठ्यासंख्येने उपस्थित होते. आत्महत्तेस कारणीभूत ठरणाऱ्या मुलीच्या सासरच्या लोकांविरूध्द मुलीच्या माहेरकडील लोक पाटण पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती मयत विवाहित मुलीच्या नंदेचा मालक फारूख बशीर शेख (सातारा) यांना समजल्यावर ते स्वत: पाटण येथे आले.

मुलीच्या माहेरच्या लोकांचे मानसिक संतुलन ढासळले असतानाही फारूख बशीर शेख यांनी पाटण येथे येवून जर तुम्ही नफिसाच्या मृत्यूबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुमच्या सर्वांचा बाजार करीन अशी भाषा वापरली. स्वत:चे पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून मयत मुलीच्या माहेरच्या लोकांवर दबाव टाकून पोलिसात तक्रार देवून तरी बघा अशी धमकी दिली. त्यामुळे या व्यक्तीपासून आम्हाला धोका असून त्याच्यावर कायदेेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाटणमधील शेकडो मुस्लिम समाजातील महिला व पुरूषांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर पाटणमधील शेकडो मुस्लिम समाजातील महिला व पुरूषांच्या सह्या आहेत.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular