Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीहजारो भाविकांनी घेतले स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन

हजारो भाविकांनी घेतले स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन

म्हसवड : महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, विदर्भ, मराठवाडा आदी राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत व म्हसवडचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्दनाथ मंदिरातील भुयारात असलेल्या स्वयंभू शिवलिंगाचे महाशिवरात्रीच्या रात्री सुमारे चाळीस हजार भाविकांनी रांगेतून दर्शन घेण्याचा लाभ घेतला. हे भुयार वर्षातून एकदाच भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते. येथील श्री सिध्दनाथ मंदिरातील भुयारात एक स्वयंभू शिवलिंग आहे.ते वर्षभर बंद अवस्थेत असते.वर्षातून फक्त एक वेळ तेही महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर तमाम भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते.
या परंपरागत चालत आलेल्या पद्धती, रिवाजानुसार सालाबादप्रमाणे श्रींची दैनंदिन रात्रीची आरती संपल्यानंतर रात्री 10 वाजता हे भुयार उघडण्यात आले. प्रथम भुयारातील साफसफाई करून परंपरागत प्रथेनुसार स्वयंभू शिवलिंगाला पंचाम्रत व गरम उदकाने अभ्यंग स्नान घालण्यात आले. नंतर विधीपूर्वक पंचाम्रताने जलाभिषेक करण्यात आला.नंतर सालकरी यांच्या हस्ते शिवलिंगास दहीभात पूजा बांधण्यात आली व आरती झाल्यानंतर दहीभात पूजा उतरविण्यात आली. पुन्हा गरम उदकाने स्वयंभू शिवलिंगासस्नान घालण्यात आले. त्यानंतर बेल, फुले, आब्याचा मोहर, चंदन, हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का, भस्म, अक्षता, श्रीफळ, आदी पूजा साहित्य वाहून संकल्प सोडण्यात आला.
हा सर्व धार्मिक विधी सालकरी व सालकरीण यांच्या हस्ते परंपरागत प्रथेनुसार करण्यात आला. हा धार्मिक विधी उरकल्यानंतर स्वयंभू शिवलिंग भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. रात्री 10 वाजता भाविकांच्या रांगेतून दर्शनास प्रारंभ झाला. रात्री 10 पासून पहाटे साडेचार वाजेपर्यंत दर्शनरांगेतून सुमारे चाळीस हजार भाविकांनी या स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनाचा लाभ घेतला.
पहाटे साडेचार वाजता पुन्हा सालकर्‍यांच्या हस्ते शिवलिंगास स्नान घालून, संपूर्ण भुयाराची स्वच्छता करून भुयाराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले.
परंपरागत प्रथेनुसार सर्व धार्मिक विधी उरकून दरवर्षी हेभुयार स्वयंभू शिवलिंगाच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते.
यावेळी देवस्थान ट्रस्ट व पोलिस स्टेशन यांचेकडून भाविकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व प्रकारे खबरदारी घेण्यात येते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular