Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीविकासाची झलक आणि जिद्द विकासकामांच्या माध्यमातून पहायला मिळेल: खा.श्री.छ. उदयनराजे

विकासाची झलक आणि जिद्द विकासकामांच्या माध्यमातून पहायला मिळेल: खा.श्री.छ. उदयनराजे

सातारा: सातारचे नाक म्हणून पोवई नाका ओळखला जातो. या ठिकाणी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पराक्रम आणि परंपरेची प्रेरणा सातारकरांना देत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाची उंची, वाढवण्यात येवून, लिंबखिंडीमधुनही या पुतळयाचे दर्शन घडेल असे नियोजन आहे, अशी माहीती देतानाच या ठिकाणी 2050 सालच्या संभाव्य वाहतुकीचा ताण येवू नये म्हणून आम्ही उड्डाणपूल किंवा ग्रेडसेपरेटर करणार असे घोषित केले. सातारचा विकासच होवू नये अशी कुत्सित भावना असलेल्या काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी आमच्या घोषणेला हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न केला. तथापि सातारची ऐतिहासिक परंपरा टिकवून ठेवून जर विकास करायचा असेल तर ग्रेड सेपरेटर सारख्या मोठया कामांची गरज आहे.
या विकास कामांमुळे भविष्यात येथील व्यापार उदिमाला वेगळेच महत्व येणार आहे. विकासाची झलक आणि जिद्द या विकासकामांच्या माध्यमातुन सर्वाना पहायला मिळेल असा विश्‍वास सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केले आहे.
सातारला लाभलेली शांतता आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा आम्ही कसोशीने पुढे नेत आहेात. सातारचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उड्डाणपूल/ग्रेडसेपरेटर, भुयारी गटर योजना, कास धरण योजना, ब्रेक टेस्ट ट्रॅक, घनकचरा व्यवस्थापन, अश्या अनेक विकास प्रकल्पांची घोषणा आम्ही केली होती, त्यावेळी ग्रेडसेपरेटरच्या कामाबाबत काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी अवहेलना केली. सातारला ग्रेडसेपरेटर किंवा उड्डाणपूल कशाला पाहीजे 1 होवू शकणार नाही, अश्या पध्दतीची मते कूपमंडुक प्रवृत्तीच्या व्यक्तींनी कुचेष्टेने मांडली. परंतु टिका टिपणी आम्ही कधीही अंगाला लावून घेत नाही.त्यामुळे आम्ही विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले. त्यानुसार अनेक विकास कामांबरोबर ग्रेडसेपरेटरच्या कामासही मंजूरी मिळुन, सदरचे काम सुरु झाले.
सुमारे 2050 सालच्या वाहतुकीची व्यवस्था आणि वाहनांची संख्या विचारात घेवून, पोवईनाका येथील आठ रस्त्यांच्या ठिकाणी कामास सुरुवात करण्यात आली आहे. 50 टक्के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, ग्रेडसेपरेटर नंतर या भागातील व्यापार उदिमाला वेगळे वलय येवून, महत्व येणार आहे. तसेच वाहतुकीला शिस्त लागेल. वाहतुकीचा ताण वाहनधारकांसह पादचा-यंना होणार नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा लिंबखिंडीमधुनही दर्शन घडेल असा उंच पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. याकरीता चौथ-याची उंची वाढवण्यात येईल. चौथ-यची उंची वाढवणे आणि पुतळा परिसराचे सुशोभिकरणाकरीता 01 कोटीचा वेगळा निधी मंजूर करण्यात आला आहे.
काही जणांना भविष्याचा विचार करण्याची कुवत नसते, त्यांना स्वतःचा आणि फक्त वर्तमानाचा विचार करण्याची सवय असते, त्यांची अशी वृत्ती असली तरी ग्रेडसेपरेटरच्या कामाचे महत्व कधीच कमी होत नाही असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular