मसूर : किवळ, ता.कराड येथील सौ.माई चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्य महिला भगिनींनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट दिली, त्यावेळी त्यांनी कारखाना कार्यस्थळावर उभारलेल्या आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले.
कराड उत्तरचे आ.बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याने उत्कृष्ठ ऊस गाळप, साखर उत्पादन आणि सर्वोत्कृष्ठ ऊस दराची परंपरा टिकवून ठेवली असून, सभासद शेतकर्यांचे हित जोपासले आहे. सह्याद्रि कारखान्याच्या माध्यमातून शेतकरी, सभासदांची आर्थिक प्रगती साध्य झाली असल्याचे मत सौ.माई चॅरिटेबल ट्रस्टच्या व कराड पं.स.सदस्या तथा माजी सभापती शालन माळी यांनी भेटीप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिलांचे स्वागत केले व कारखान्याच्या काजकाजासंबंधी सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमास कारखान्याचे फायनान्सीयल अॅडव्हायजर एच टी देसाई, चीफ अकौंटंट जी.व्ही.पिसाळ, कामगार व कल्याण अधिकारी एन.आर.जाधव व उप ऊस विकास अधिकारी एस. जी. चव्हाण आदि अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी कारखान्याच्या संचालिका प्रांजली साळुंखे यांनी उपस्थित महिला भगिनींचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले.
सह्याद्रि कारखान्यास सौ.माई चॅरिटेबल ट्रस्टच्या महिला सदस्यांची सदिच्छा भेट
RELATED ARTICLES