Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीविक्रमबाबा पाटणकर आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने पाटणचे कचरा डेपो उपोषण मागे

विक्रमबाबा पाटणकर आणि तहसीलदार यांच्या मध्यस्थीने पाटणचे कचरा डेपो उपोषण मागे

पाटण:- पाटण नगरपंचायतीने पाटण शहरातील नागरी वस्तीपासून जवळच असलेल्या पाटण स्पोर्टस क्लब स्टेडियम जवळ गेल्या वर्षभरापासून कचरा डेपो सुरू केला असल्याने या कचरा डेपोच्या विरोधात स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी पाटण नगरपंचायतीच्या विरोधात अमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सांयकाळी ५ वा. सुमारास सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर आणि तहसीलदार रामहरी भोसले यांच्या मध्यस्थीने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. उपोषण जरी मागे घेतले असले तरी लोकशाही मार्गाने कचरा डेपो विरोधातील आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले.

कचरा डेपोच्या दुर्गंधीने येथील रहिवाशी नागरीक हैराण झाले असून. तसेच कचरा डेपोच्या लगत असणाऱ्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे. हा कचरा डेपो बंद करण्यासाठी वेळोवेळी पाटण नगरपंचायतीला व प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देऊन मागणी केली होती. मात्र या मागणीवर पाटण नगरपंचायतीने अथवा शासकीय यंत्रणेने कोणतेच ठोस निर्णय आज पर्यंत घेतले नाहीत. नगरपंचायतीने येथील नागरिकांना केवळ वेळोवेळी फसविण्याचे काम केले आहे.

पाटण नगरपंचायतीच्या व प्रशासकीय निंदनीय कारभारा विरोधात व पाटण स्पोर्ट्स क्लब शेजारील बेकायदेशीर सुरू असलेला कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी येथील शेतकरी रहिवाशी नागरीकांनी पाटण तहसील कार्यालयासमोर सोमवार दि. ११ मार्च पासून अमरण उपोषण सुरू केले होते. आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी ५वा. सुमारास सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर आणि पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता उपोषण कर्त्यांनी उपोषण मागे घेतले मात्र जो पर्यंत कचरा डेपो बंद होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले. यावेळी उपोषण कर्ते शिवाजी लुगडे, संजय शिंदे, सुशांत शिंदे, तुकाराम कदम , जंगम गुरुजी, योगेश घाडगे, संजय भोज, आकाश सांळुखे, प्रुथ्वीराज पवार, उदय कदम, शुभम सोनावले, अनमोल पाटील, संकेत महाडिक, सागर देवकांत, तेजस गायकवाड, रविंद्र कदम, प्रकाश सांळुखे, प्रताप कदम, बाबुराव शिंदे, जनार्दन ऐर, सदानंद नांगरे, लक्ष्मण मोहिते, संजय भोज, यांच्यासह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular