Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमसूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिक्षीत तर उपसरपंचपदी जगदाळे

मसूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिक्षीत तर उपसरपंचपदी जगदाळे

मसूर: मसूर ता.कराड येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पहीले लोकनियुक्त सरपंच म्हण्ाून पंकज बाळकृष्ण दिक्षीत यांनी आज पदभार स्विकारला तर उपसरपंचपदी युवा नेते विजयसिंह मानसिंगराव जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली. जनतेने विश्‍वासाने टाकलेली जबाबदारी पार पाडताना सर्वांना बरोबर घेवून पारदर्शक कारभार करेन व मसूरचा नावलौकिक वाढवण्याची ग्वाही यावेळी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांनी दिली.
लोकनियुक्त सरपंच पंकल दिक्षीत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मार्गदर्शक नेत्यांच्या व कार्यकत्यार्ंच्या उपस्थितीत उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उपसरपंच पदासाठी युवानेते विजयसिंह जगदाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून व ङ्गटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एल.गोखले यांनी काम पाहीले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, मंडलअधिकारी राम गुरव, तलाठी मृदुला कुलकर्णी,विस्तार अधिकारी आर.के.गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य म्हणून रमेश जाधव, संजय शिरतोडे, प्रमोद चव्हाण, कैलास कांबळे, सुनिल जगदाळे, अक्षय कोरे, कौसल्या पाटोळे, पूजा साळुुंखे, कांचन पारवे, शुभांगी जगदाळे, वैशाली पाटोळे, रूपाली गरवारे, सुनिता मसूरकर, अलका यादव, निलोङ्गर मोमीन यांनीही पदभार स्विकारला.
यावेळी जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे म्हणाले निवडणूक प्रक्रिया झाल्याने राजकारण संपले असून आता समाजकरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे व विश्‍वासाने जबाबदारी दिली आहे ती समर्थपणे पेलून मसूरचा सर्वांगीण विकास करताना निवडणूकीत दिलेल्या जाहीरनाम्याची पूर्तता करा.पदाधिका-यांनी कामकाजात शिस्त लावताना ग्रामस्थांची तक्रार येणार नाही याची काळजी घ्या.ग्रामपंचायतीचा कारभार संगणीकृत करून पारदर्शक कारभाराचा आदर्श जनतेपुढे ठेवा.सूत्रसंचालन अ‍ॅड.रणजितसिंह जगदाळे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य रमेश जाधव यांनी मानले.सदर निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular