Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीविधानसभेची रंगीत तालीम समजून कामाला लागा:आ. मकरंद पाटील

विधानसभेची रंगीत तालीम समजून कामाला लागा:आ. मकरंद पाटील

वाई: होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदार संघातून श्रीमंत छ.खा. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार आहेत. तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी वाई तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षातील सर्व पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून विधानसभेची रंगीत तालीम समजून कामाला लागावयाचे आदेश आमदार मकरंद पाटील यांनी वाईतील मंगल कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
यावेळी श्रीमंत छ.खा.उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्य वाई तालुक्यातून देणार असल्याचे जाहीर करण्यात आले, या आढावा बैठकीस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रतापराव पवार, जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, बावधन सूतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, किसनवीर कारखान्याचे माजी संचालक दासबाबू गायकवाड, पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप बाबा पिसाळ, प्रमोद शिंदे, विजयसिंह नायकवडी, मदन भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, पंचायत समितीचे उपसभापती अनिल जगताप, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, माजी नगराध्यक्ष रमेश आप्पा गायकवाड, भूषण गायकवाड, राजाभाऊ खरात, अ‍ॅड.श्रीकांत चव्हाण, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्याध्यक्ष- संजय आप्पा लोळे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोकराव सरकाळे, डॉ. अमर जमदाडे, बापूसाहेब जमदाडे, नगरसेवक प्रदीप चोरगे, राजेश गुरव, यशवंत जमदाडे, निखील सोनावणे, राजेंद्र तांबेकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, संपूर्ण देशासह, महाराष्ट्रात, सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ बांधून ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, सध्या राजकारणात बंडाळीचे पिक उफाळून आले असून फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात चालू आहे, अशावेळी कोणताही किंतु मनात न आणता पक्षाची ताकत वाढवून जास्तीत-जास्त मताधिक्य देवून आपल्या मतदार संघातील उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांची विचारांची सत्ता देशासह महाराष्ट्रात येण्यासाठी जास्ती-जास्त खासदार निवडून आणण्यासाठी विधानसभेची रंगीत तालीम समजून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाल लागावे, तसेच देशात व राज्यात राष्ट्रवादी- काँग्रेस पक्षांमध्ये युती झाल्याने मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सन्मानाची वागणूक यापुढे देण्यात येईल असेही आमदार पाटील यांनी जाहीर केले.
सातारा लोकसभा निवडणुकीचे उमेदवार श्रीमंत छ.उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन यावेळी आबांनी केले.
यावेळी अनिल सावंत, राजाभाऊ खरात, दिलीप बाबा पिसाळ, निखील सोनावणे, अ‍ॅड.श्रीकांत चव्हाण, यशवंत जमदाडे, विजय नायकवडी, शशिकांत पिसाळ, यांनी मनोगत व्यक्त करीत छ. उदयनराजे भोसले यांनी मताधिक्य देण्याचे आवाहन केले.
यावेळी वाई तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular