परळी: शिवतेज माध्यमिक विद्यालय समर्थनगर आरे येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्राहक मंच सातारा यांच्यातर्फे व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना ग्राहक कायदा ग्राहकांमधील जागरूकता सध्या ग्राहकांची जाहिराती मधून होणारी फसवणूक यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सदर कार्यक्रमांमध्ये ग्राहक पंचायती महाराष्ट्र सातारा जिल्हा शाखेत सुनिता राजेघाटगे, माजी उपाध्यक्ष विष्णू पंत मेटे, रंगराव जाधव सदर यांनी व्याख्यान मार्गदर्शन केले. श्री भैरवनाथ संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष विश्वासराव देशमुख यांनी तसेच मुख्याध्यापक मधुकर जगदाळे शिक्षक व शासकीय कर्मचारी उपस्थित होते.
ग्राहक पंचायत समितीमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
RELATED ARTICLES