Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीफलटणला कांदा विक्री अनुदान प्रस्ताव स्वीकारण्यास मुदत वाढ

फलटणला कांदा विक्री अनुदान प्रस्ताव स्वीकारण्यास मुदत वाढ

फलटण : फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍याचे कांदा अनुदान प्रस्ताव स्वीकारण्यास व कांदा विक्री कालावधीस मुदत वाढ दिली असून दि.01 नोव्हेंबर 2018 ते 31 डिसेंबर 2019 ऐवजी आता दि.28 फेब्रुवारी 2019 अखेर कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना कांदा अनुदान मिळणार आहे.
अनुदानासाठीचे प्रस्ताव 30 मार्च 2019 पर्यंत बाजार समितीच्या कार्यालयात कागदपत्रांसह सादर करण्यात यावेत असे आवाहन फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
राज्यातील कांदा पिकाने दर गडगडल्याने राज्य शासनाने कांदा पिकाला प्रति क्विंटल रु.200/ अनुदान देण्याचा निर्णय घेवुन शेतकर्‍यांना दिलासा दिला होता. सहकार व पणन खात्याच्या वतीने यापूर्वी दि.1 नोव्हेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019 अखेर विक्री केलेल्या शेतकर्‍यांना अनुदान देण्यास निर्णय घेतला होता. परंतु आता दि.28 फेब्रुवारी 2019 अखेर बाजार समिती आवारात कांदा विक्री केलेल्या शेतकर्‍यांना कांदा अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांदा अनुदान मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी मुळ विक्री पट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सात बारा उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, अधार कार्ड व मोबईल क्रमांक आदींची पूर्तता असलेला फॉर्म व दि. 30 मार्च 2019 पर्यत समितीचे कार्यालयात सादर करावा. शेतकर्‍यांनी कांदा अनुदानाच्या अधिक माहितीसाठी फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये संपर्क साधावा असे आवाहन शंकरराव सोनवकर यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular