म्हसवड: आज गोंदवले खुर्द ता. माण येते मोठ्या उत्साहात तुकाराम बीज साजरी करण्यात आली. सतीश पोळ हे दरवर्षी स्वता बीज साजरी करतात आज 12 वाजून 40 मिनिटांनी तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून हा कार्यक्रम संपन्न झाला.
तुकाराम बीज निमित्त पूर्व संध्येला पोळ वाड्यात तुकाराम महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून स्थापना करण्यात आली त्यानंतर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम पार पडला.
सकाळी तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली व त्यानंतर भाजनाला सुरुवात झाली.
तुकाराम महाराजांच्या जीवनावरील अभंग म्हणण्यात आले व बरोबर दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून आरती संपन्न झाली व उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
गोंदवले खुर्द येथे तुकाराम बीज उत्साहात
RELATED ARTICLES