ना. नरेंद्र पाटील शिवसेनेतून सातारा लोकसभा निवडणूक लढवणार?
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आता भाजपचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील हेच उमेदवार असणार आहेत. ते कोल्हापूरला 24 मार्चला होणार्या युतीच्या मेळाव्यात ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेतून ते सातारा लोकसभा लढणार आहेत. त्यामुळे उदयनराजे यांना यावेळी निवडणूक सोपी राहिलेली नाही.
उदयनराजेंच्या विरोधात युतीकडून सोपा उमेदवार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते. पण भाजप व शिवसेनेत ताळमेळ होत नव्हता तसेच सातार्याची जागा शिवसेना भाजपला सोडण्यास तयार नव्हती. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या माध्यमातून भाजपने सातारा लोकसभा लढण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ताकद मिळाली होती. त्यादृष्टीने श्री. पाटील यांनी सुरवातीला सातारा जिल्ह्यात चांगलेच रान उठवले होते. श्री. पाटील यांनी उदयनराजेंच्या विषयी नाराज असलेले राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सोबत मिसळ खाल्ली होती. या दोन नेत्यांच्या मिसळीचा ठसका अनेकांना लागला. त्यावेळी नरेंद्र पाटील उमेदवार असतील तर उदयनराजेंना निवडणूक सोपी राहणार नाही हे भाजपने ओळखले होते. पण शिवसेना सातार्याची जागा सोडण्यास तयार नव्हती.
शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्यांनी भाजपचे खंडाळ्याचे नेते पुरुषोत्तम जाधव यांना सेनेत घेतले होते. पण त्यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस हे सातार्यासाठी आग्रही होते, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मतदारसंघ सोडण्यास तयार नव्हते. शेवटी या दोन नेत्यांत चर्चा झाली व त्यांनी पर्याय म्हणून नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत घेऊन त्यांना सातारा लोकसभेचे तिकीट देण्याच्या प्रस्तावावर दोन्ही बाजूकडून मान्यता मिळाली. त्यामुळे आज (शुक्रवार) दुपारी साडेबारा वाजता नरेंद्र पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तेथे त्यांची शिवसेनेत प्रवेश करण्याची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण होईल. 24 मार्चला कोल्हापूरला होणार्या युतीच्या मेळाव्यात नरेंद्र पाटील शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील. तेथेच त्यांची उमेदवारी ही जाहीर होणार आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात आज पर्यंत एकतर्फी वाटणारी निवडणूक नरेंद्र पाटील यांच्या उमेदवारी मूळे चुरशीची आणि रंगतदार होणार आहे. तसेच उदयनराजेंना खासदारकीची हॅट्ट्रिक सोपी राहणार नाही.
सातार्यात पहायला मिळणार ‘हायहोल्टेज’ लढत
RELATED ARTICLES